पॉलीसी नावाखाली घातला गंडा महिलेची दहा लाखाची फसवणूक

पतीच्या निधनानंतर विमाधारक पत्नीची १० लाखांची फसवणूक, एजंटसह इतरांवर गुन्हा दाखल
Fraud of woman by policy agent
पॉलिसी एजंट कडून महिलेची फसवणूकPudhari File Photo

जळगाव : पतीच्या निधनानंतर पॉलिसीमधून मिळालेले १० लाख रूपये एजंटसह इतरांनी परस्पर काढून घेत विमाधारक व्यक्तीच्या पत्नीची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याबाबत रामानंद परिसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fraud of woman by policy agent
बीड : पाथर्डी येथे अग्नी तांडव, कोट्यावधी रुपयांचे नुकसान

याबाबत अधिक माहिती अशी की, लाचाबाई भाईदास पवार (वय ४२ रा. मांडवे दिनगर, भुसावळ) या आपल्या कुटुंबासह राहत आहेत. २१ नोव्हेंबर २०२३ रोजी त्यांचे पती भाईदास छगन पवार यांचे निधन झाले. त्यांनी जिवंत असतांना शशिकांत दिलीप बागडे (रा. कंजरवाडा) यांच्याकडून पॉलिसी काढली होती. पॉलिसीची मॅचुरीटी झाल्यानंतर १० लाख रूपये मिळणार असे पॉलिसी एजंटने सांगितले होते. भाईदास पवार यांचे २१ नोव्हेंबर २०२३ रोजी निधन झाले. पतीच्या निधनानंतर लाचाबाई पवार यांनी पॉलीसीची रक्कम मिळावी यासाठी सर्व कागदपत्र जमा करून बँकेत खाते उघडले. खाते उघडल्यानंतर त्यांच्या खात्यावर पॉलीसीचे ११ लाख रूपये १७ जानेवारी २०२४ रोजी जमा झाले होते.

Fraud of woman by policy agent
Shani Retrograde | शनी वक्री उद्यापासून; 'या' राशींना पुढील साडेचार महिने खडतर

मात्र, त्याच दिवशी पाच लाख रुपये आणि २५ जानेवारीला एक लाख पॉलिसी एजंट शशिकांत बागडे यांनी आयएमपीएसच्या माध्यमातून समृद्धी प्रॉपर्टीज या कंपनीच्या अकाउंट वर वर्ग केली. १८ जानेवारीला पाच लाख रुपये विशाल पाटील यांच्या बँक खात्यात वर्ग केले. लाचाबाई पवार बँकेत गेल्यावर हा सर्व प्रकार उघडीसाला शशिकांत बागडे यांना विचारणा केली, तर त्यांनी एक लाख रुपये दिले आणि उर्वरित दहा लाख रुपये थोड्या दिवसांनी देण्याचे सांगितले. पैसे मिळत नसल्याने लक्षात आल्यावर २७ रोजी लाचाबाई पवार यांनी रामानंद नगर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. शशिकांत दिलीप बागडे (रा. कंजरवाडा, जळगाव) विशाल पाटील आणि समृध्दी प्रॉपर्टीचे खातेधारक यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनि विठ्ठल पाटील हे करीत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news