बीड : पाथर्डी येथे अग्नी तांडव, कोट्यावधी रुपयांचे नुकसान

आगीमध्ये दहा ते बारा दुकानांचे मोठे नुकसान; महसुल विभागाकडून पंचनामे दाखल
A massive fire broke out at Jijamata Chowk in Pathardi
पाथार्डी येथील जिजामाता चौकात लागलेली भीषण आगPudhari Photo

शिरूर कासार : बीड शहरातील पाथर्डी रोडवर जिजामाता चौकात गुरूवारी (दि. 27) मध्यरात्री भीषण आग लागली होती. या आगीमध्ये दहा ते बारा दुकांनाचे मोठे नुकसान झाले आहे. आगीमध्ये कोट्यावधी रुपयांच्या साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीची माहिती मिळताच आष्टी, पाटोदा, पाथर्डी, बीड येथून चार अग्निशमन दलाच्या गाड्या हजर झाल्या. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. शुक्रवारी दि.28) सकाळी महसुल विभागाने सविस्तर पंचनामे केले आहेत. तर आमदार धस यांनी घटनास्थळी भेट देऊन व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.

गुरूवारी मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान एका दुकानाला आग लागल्याचे गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी सदर घटनेची माहिती अग्नीशमन दलाला दिली. तातडीने चार अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. या दरम्यान आगीमध्ये दहा ते बारा दुकानांना भीषण आग लागली होती. या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. महसुल विभागाने केलेल्या पंचनाम्यामध्ये ही आग शॉट सर्किटमुळे लागल्याची माहिती समोर आली आहे.

A massive fire broke out at Jijamata Chowk in Pathardi
Delhi Fire |घराला आग लागून एकाच कुटुंबातील ४ जणांचा होरपळून मृत्यू

जिजामाता चौकात लागलेल्या आगीत संतोष धनराज गटागट यांचे किराणा दुकान, सचिन चंद्रकांत जाधव याचे जाधव कॉम्पूटर आणि सिसीटीव्हीचे दुकान, कृष्णा चंद्रकांत जाधव यांचे कॉफी सेंटर, बाबासाहेब सव्वासे यांचे किराणा दुकान, शेख जमीर बागवान यांचे ज्युसबार व फ्रुट स्टॉल, नितीन भाऊसाहेब जाधव यांचे ईश्वरी कलेक्शन, रामेश्वर महादेव घोडके यांचे शिवशंभो अॅग्रो एजन्सी, शिवाजी पांडूरंग टाचतोडे यांचे कोमल फुटवेअर, विशाल लक्ष्मण सव्वासे कॉफी सेंटर, अशा दहा ते बारा दुकानांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news