जळगाव : दुग्ध व्यवसायासाठी कर्ज मंजूर करण्याच्या आश्वासनाने आर्थिक फसवणूक; तिघांवर कारवाई

जळगाव : दुग्ध व्यवसायासाठी कर्ज मंजूर करण्याच्या आश्वासनाने आर्थिक फसवणूक; तिघांवर कारवाई

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा उद्योग केंद्रातील अधिकारी ओळखीचे असून दुग्ध व्यवसायासाठी कर्ज मंजूर करून देतो, असे सांगून मौजेपुरी येथील महिलेची १० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने विद्या परेश शाह या महिलेला आज (दि.१३) दुपारी अटक केली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर तालुक्यातील मौजेपुरी येथील तक्रारदार महिला दुग्ध व्यवसायाच्या कर्जासाठी आठ ते दहा दिवसांपूर्वी जिल्हा उद्योग केंद्रात गेल्या होत्या. यावेळी विद्या शाह यांच्याशी त्यांची ओळख झाली. यावेळी जळगाव कार्यालयातील अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत. त्यांच्याकडून कर्ज मंजूर करून देतो, असे म्हणत शाह हिने ३० हजाराची मागणी केली. तक्रारदार महिलेने १० हजार देण्याचे मान्य केले. त्यांनतर तकारदार महिलेने लाचलुचपत विभागात तक्रार दिली. जळगाव जिल्हा उद्योग केंद्रात  १० हजाराची रक्कम घेताना विद्या शाह हिला आज लाचलुचपत विभागाने अटक केली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news