

Father Daughter Electric Shock Death Taskheda Raver Taluka
जळगाव : मुलीला विजेच्या तारांचा स्पर्श होऊन विजेचा धक्का लागताच तिला वाचविण्यासाठी गेलेल्या पित्यालाही विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तासखेडा (ता. रावेर) येथे आज (दि. १३) सकाळी सहाच्या सुमारास घडली. समाधान तायडे (वय ३६) व मानवी समाधान तायडे (वय ९) अशी मृत पितापुत्रीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, समाधान तायडे हा केळी व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. आज सकाळी पाच ते सहा च्या दरम्यान घराजवळ मुलगी मानवी खेळत होती. तेव्हा तिला उघड्या जिवंत विजेच्या तारेचा स्पर्श झाला. स्पर्श होताच मानवीला विजेचा जबर धक्का बसला.
यावेळी जवळच असलेले तिचे वडील समाधान मुलीला वाचविण्यासाठी धावले असता त्यांनाही विजेचा जबर धक्का बसला. दोघांचा मृतदेह भुसावळ येथील रूग्णालयात नेण्यात आला. या घटनेमुळे तासखेडा येथे शोककळा पसरली आहे.