Online Fraud Jalgaon | पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून माजी सैनिकाची १० लाखांची ऑनलाइन फसवणूक

व्हॉट्सअॅपवरून संपर्क साधत विश्वास संपादन; जळगाव सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Online Fraud
Online FraudPudhari
Published on
Updated on

Cyber Fraud Jalgaon

जळगाव : व्हॉट्सअॅपवर स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवून एका माजी सैनिकाची तब्बल १० लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील दामोदर राजधर चौधरी (वय ७०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २५ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२६ या कालावधीत संदीप शर्मा नावाने ओळख सांगणाऱ्या व्यक्तीने व्हॉट्सअॅपद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला. स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगून त्याने फिर्यादीला विविध कारणांनी घाबरविले तसेच विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगत आरटीजीएसद्वारे टप्प्याटप्प्याने १० लाख रुपये स्वतःच्या खात्यात जमा करून घेत आर्थिक फसवणूक केली.

Online Fraud
Jalgaon Crime news: शेतात नेऊन विवाहितेवर वारंवार अत्याचार; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत १ लाख उकळले

या प्रकरणी २४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८/२०२६ नोंदविण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० मधील कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर करीत असून, आरोपीचा शोध सुरू आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या व्हॉट्सअॅप कॉल, संदेश किंवा स्वतःला सरकारी अधिकारी म्हणून ओळख सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये तसेच कोणतीही रक्कम पाठविण्यापूर्वी संबंधित माहितीची खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news