

जळगाव : एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथील गट नंबर 21 म्हसावद रोडवर असलेल्या शेतामध्ये झटका तारेचा करंट लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला ती तार बॅटरीला न लावता थेट थ्री फेज मधील करंट त्यामध्ये सुरू करण्यात आला, त्यामुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवार गट नंबर 21 बंडू युवराज पाटील यांचे म्हसावद रोडवर शेत आहे. या शेतात जंगलातील प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या चारही बाजूने झटका तारे लावण्यात आलेली आहे. मात्र या झटका ताऱ्यांना देण्यात येणारा बॅटरीचा विद्युत प्रवाह न देता हे थ्री फेज चा प्रवाह देण्यात आला होता. त्यामुळे पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव या ठिकाणी राहणारे व मृत्यू झालेल्यांमध्ये विकास रामलाल पावरा व त्यांची पत्नी सुमन विकास पावरा तसेच त्यांची दोन मुले पवन विकास पावरा आणि कंवल विकास पावरा तसेच वृद्ध महिला (नाव माहित नाही यांचा समावेश आहे. तर दुर्गा विकास पावरा (वय दीड वर्षे) ही घटनेतून बचावली आहे.