भुसावळमधील वृध्दाची १९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

Jalgaon Online Fraud | भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Jalgaon Online Fraud |
भुसावळमधील वृध्दाची १९ लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली.Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

जळगाव : भुसावळ शहरातील तापी नगरात राहणाऱ्या एका 65 वर्षीय वृद्धाला बँकेचे व्यवहार घरपोच करून देऊन चांगले रिटर्न मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 19 लाख 405 रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ येथील प्रदीपसिंह प्रतापसिंह परदेशी (रा. तापी नगर) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून ते सेवानिवृत्त आहेत. 10 मार्च 2023 ते 6 डिसेंबर 2023 च्या दरम्यानच्या काळात जळगाव येथे राहणारे संदीप चौधरी आणि सोनाली चौधरी यांनी प्रदीपसिंह परदेशी यांना बँकेचे व्यवहार घरपोच करून देऊन चांगले रिटर्न मिळवून देऊ असे सांगून त्यांच्याकडून कॅश, ऑनलाईन आणि चेकद्वारे तब्बल १९ लाख ४०५ रुपये घेतले. त्यांनी बनावट हुबेहूब दिसणारे कागदपत्र तयार करून अपहार केला.

दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रदीपसिंह परदेशी यांनी सोमवारी (दि.25) भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी संदीप चौधरी व सोनाली चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पीएसआय विजय गायकवाड हे करीत आहे.

Jalgaon Online Fraud |
Thane Online Fraud : डोंबिवलीत ऑनलाईनद्वारे फसवणूक करणारी टोळी सक्रिय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news