Drug Smuggling | स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, धरणगावात गांजाप्रकरणी एकास अटक

Drug Smuggling | स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धरणगाव–चोपडा रस्त्यावर मोठी कारवाई करत ७ किलो ५४५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.
crime news
crime newsCanva
Published on
Updated on

जळगाव: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धरणगाव–चोपडा रस्त्यावर मोठी कारवाई करत ७ किलो ५४५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाची किंमत अंदाजे १ लाख ८८ हजार ६२५ रुपये इतकी असल्याचे सांगितले जाते. अवैध गांजा बाळगल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून धरणगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime news
Jalgaon Crime : सोनसाखळी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस; दोन सराईतांना अटक

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदाराकडून धरणगाव–चोपडा रोडवरील शासकीय आयटीआयजवळ एका व्यक्तीकडे अवैध गांजा असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, अंमलदार तसेच धरणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पथक तयार करण्यात आले.

पथकाने तातडीने घटनास्थळी छापा टाकला असता, हिरव्या रंगाच्या गोणीत सुका गांजा ठेवलेला आढळला. हा गांजा बाळगणारा आरोपी हर्षल संतोष गारुंगे (वय २०, रा. जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एकूण ७.५४५ किलोग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजित किंमत १ लाख ८८ हजार ६२५ रुपये इतकी आहे.

या प्रकरणी आरोपी हर्षल गारुंगे याच्याविरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये CCTNS No. ०३९२/२०२५ नुसार NDPS ॲक्ट ८ (C), २०(B)(२) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

crime news
Ganja Seized : धरणगावजवळ साडेसात किलो गांजा जप्त

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परीमंडळ कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा अण्णासाहेब घोलप, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि. जितेंद्र वल्टे, पोहे. विष्णु बि-हाडे, पोहे. दिपक माळी, पोहे. रविंद्र पाटील यांच्यासह धरणगाव पोलीस स्टेशनचे पोउपनि. संतोष पवार, पोहे. सुधीर, पोकॉ. संदीप पाटील, किशोर भोई यांनी सहभाग घेतला.

जळगाव पोलीस दलाने अवैध अंमली पदार्थांवर कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असून परिसरात सतत गस्त वाढवण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news