

धरणगाव (जळगाव): धरणगाव–चोपडा रस्त्यावरील शासकीय आयटीआयजवळ पोलिसांनी सुमारे साडेसात किलो गांजा जप्त केला. सोमवार (दि.3) रोजी रात्री आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकासह धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
घटनास्थळावरून एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अचानक झालेल्या या कारवाईमुळे परिसरात मागील काही तासांपासून चर्चा रंगत आहे.