Jalgaon Burglary | रावेर तालुक्यात दिवसाढवळ्या घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

रोकड, सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी केले लंपास; निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल
Burglary
BurglaryPudhari
Published on: 
Updated on: 

Raver Daylight Theft

जळगाव : रावेर तालुक्यातील सिंगनूर येथे दिवसाढवळ्या घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. घराला कुलूप लावून मजुरीसाठी गेलेल्या महिला शेतमजुराचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंगनूर (ता. रावेर) येथील रहिवासी शोभा सुभाष पाटील (वय ४४) या मजुरी करून उदरनिर्वाह करतात. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी आठच्या सुमारास त्या घराला कुलूप लावून कामासाठी बाहेर गेल्या होत्या. सायंकाळी पाच वाजता त्या घरी परतल्या असता, घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात जाऊन पाहणी केली असता, लाकडी कपाटाचेही कुलूप तोडून त्यातील ऐवज चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.

Burglary
Jalgaon crime news: १० लाखांच्या कर्जासाठी तब्बल ७७ लाखांची मागणी; मुद्दल-व्याज फेडूनही सावकाराचा तगादा सुरूच

चोरट्यांनी कपाटातील एक लाख ५० हजार रुपयांची रोकड, ओम लॉकेटसह सोन्याची चैन, मंगळपोत, झुमके, गव्हाचे मणी, बाळ्या, टॉप्स आणि चांदीचे कडे असा एकूण २ लाख २६ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. दिवसभर घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी ही चोरी केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी शोभा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निंभोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ) आणि ३३१ (३) अन्वये गुन्हा क्रमांक २२७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याच्या दृष्टीने पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news