बुक्का मारून सावत्र भावांना जागा दाखवा: एकनाथ शिंदेंचे 'बहिणीं'ना आवाहन

Eknath Shinde | जळगाव येथे मुख्यमंत्री शिंदे यांचा विरोधकांवर निशाणा
Eknath Shinde
जळगाव येथे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. Pudhari News Network
Published on
Updated on

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : माझ्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपयांची योजना सुरू केल्यानंतर विरोधक म्हणजे सावत्र भाऊ यांनी कोर्टापर्यंत धाव घेतली. मात्र, माझ्या पाठीशी बहिणींचा आशीर्वाद व भक्कम पाठिंबा असल्याने सावत्र भावांचे काहीच चालले नाही. मात्र, येत्या निवडणुकीत सावत्र भावांना बुक्का मारून त्यांना त्यांची जागा दाखवावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जळगाव येथे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या कार्यक्रमात ते बोलत होते. (Eknath Shinde)

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, मंत्री गिरीश महाजन, आमदार महेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आदी उपस्थित होते. (Eknath Shinde)

'अरे संसार संसार, आधी हाताला चटके

एकनाथ शिंदे यांनी बहिणींशी संवाद साधताना 'अरे संसार संसार, आधी हाताला चटके, नंतर मिळते भाकर', या बहिणाबाईंच्या कवितेच्या ओळींनी त्यांनी भाषणाला सुरुवात केली. उपस्थित बहिणींचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असेच कायम राहू द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. (Eknath Shinde)

बहिणींना भीक, लाच दिल्याची टीका

तुम्हाला संधी असताना तुम्ही बहिणींना काय दिले, असाही सवाल करून बहिणींना भीक, लाच दिली जात असल्याची टीका खालच्या पातळीवर जाऊन विरोधक करत आहेत. या योजनेसाठी ३३ हजार कोटी आम्ही वेगळे करून ठेवलेले आहेत. लाडक्या भावांसाठी आम्ही प्रशिक्षणाची सोय केली आहे. शेतकऱ्यांना वीज बिल माफ केले आहे.

विरोधकांना झेंडू बाम देऊन त्यांचे काम तमाम करा 

आनंदाचा शिधा, असो की माझी लाडकी बहीण, यासाठी विरोधक कोर्टात गेले. मात्र, ते कोर्टात जाऊनही काहीच फलश्रुती झाली नाही. मात्र, येत्या निवडणुकीत माझ्या बहिणी त्यांना त्यांची जागा दाखवतील. ते खोटे बोलून एकदाच जिंकू शकतात. मात्र, यावेळेस माझ्या बहिणीच त्यांना त्यांची जागा दाखवतील, विरोधकांना झेंडू बाम देऊन त्यांचे काम तमाम करायचे आहे, असे शिंदे म्हणाले.

Eknath Shinde
जळगाव : मुख्यमंत्री येणार! महिन्याभराने अधिकाऱ्यांना स'मि'तीचा 'मि' दुरुस्तीसाठी नजरेस आला

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news