जळगाव : मुख्यमंत्री येणार! महिन्याभराने अधिकाऱ्यांना स'मि'तीचा 'मि' दुरुस्तीसाठी नजरेस आला

मुख्यमंत्री जळगावात येणार म्हणून अधिकाऱ्यांना आठवली दुरुस्तीची कामे
जिल्हा नियोजन समिती, जळगाव
जिल्हा नियोजन समितीने सभागृहाचे नूतनीकरण करताना कर्मचारी (छाया : नरेंद्र पाटील)
Published on
Updated on

जळगाव : जिल्हा नियोजन समितीने नुकतेच सभागृहाचे नूतनीकरण केले आहे. या नूतनीकरणावर जिल्हा नियोजन समितीकडून चांगलाच खर्च करण्यात आला. मात्र नुतनीकरण करताना जिल्हा नियोजन समिती कार्यालयाच्या इमारतीवरील जिल्हा नियोजन समिती या नावातील 'मि' हे आद्याक्षर दुरस्त करण्याचा विसर पडला. तर या नावाची दुरुस्ती करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या आगमनाची वाट पहावी लागली आहे.

जळगाव जिल्ह्यामध्ये युतीच्या तिन्ही पक्षांचे मंत्री आहेत. त्यामध्ये केंद्र आणि राज्यांमध्ये सत्ता असलेले भाजपाचे व महाराष्ट्रात दबदबा असलेले गिरीश महाजन तसेच शिंदे सरकारमधील वजनदार मंत्री म्हणून गुलाबराव पाटील तर राष्ट्रवादीचे अनिल भाईदास पाटील हे तिन्ही मंत्री जळगाव जिल्ह्यात आहेत. त्यामुळे एक वेगळे वजन जळगाव जिल्ह्याला मिळालेले आहे. जिल्हा नियोजन समितीने नुकतेच सभागृहाचे नूतनीकरण केलेले असतानाही पुन्हा नव्याने खर्च करत अधिकाऱ्यांना बसण्यासाठी असलेले डेस्क व इतर सोयीसुविधा अद्ययावत करण्यात आल्या.

तर अजूनही जिल्हा नियोजन समिती सभागृहाचे काम सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी मंत्र्यांच्या हस्ते येथील सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. तर या उद्घाटन बोर्डवरही अनेक शाब्दीक चुका आढळून आल्या होत्या. तर इमारतीचे नुतनीकरण करताना जिल्हा नियोजन समिती नावातील 'मि' अक्षर पडल्याने त्याचा विसर पडला होता. आता माझी लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे खुद्द जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याने तत्काळ अधिकाऱ्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतली असून इमारतीवरील नावातही काटेकोरपणे लक्ष घालून दुरुस्ती करुन घेण्यात येत आहे. मंत्रीसंत्री आल्याशिवाय कामे होत नाही असा एक संकेतच यावरुन जनमानसात रुजवला जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news