Jalgaon Police Raid | चाळीसगावात पोलिसांची धाड; घरातून ९.३४ लाखांचा गांजा जप्त, एकाला अटक

राहत्या घरातून गांजाचा साठा करून विक्रीचा प्रयत्न; १८ किलो ६८६ ग्रॅम अंमली पदार्थ हस्तगत
Cannabis Seized Chalisgaon Jalgaon
Cannabis Seized Chalisgaon JalgaonAI photo
Published on
Updated on

Cannabis Seized Chalisgaon Jalgaon

जळगाव : चाळीसगाव शहरातील चामुंडा माता मंदिराजवळ डोंगरी नदीच्या काठावरील एका घरात बेकायदेशीररीत्या गांजाचा साठा करून त्याची विक्री करणाऱ्या संशयिताचा चाळीसगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ९ लाख ३४ हजार ३०० रुपये किमतीचा १८ किलो ६८६ ग्रॅम गांजा जप्त केला असून, संशयित भूषण केशव पवार (वय ४५) याला अटक केली आहे.

पोलिसांना २५ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १०.१० वाजता भूषण पवार हा आपल्या राहत्या घरात विक्रीच्या उद्देशाने गांजाचा साठा करून ठेवत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिस पथकाने तातडीने संबंधित घरावर छापा टाकला.

Cannabis Seized Chalisgaon Jalgaon
Jalgaon crime: अमळनेरमध्ये अख्खं कुटुंब संपलं; पती-पत्नीने दोन लहान मुलींसह रेल्वेखाली जीवन संपवले

घराची झडती घेतली असता प्लास्टिकच्या पिशवीत २ लाख ७० हजार ५० रुपये किमतीचा ५ किलो ४०१ ग्रॅम गांजा, तर पांढऱ्या गोणीत ६ लाख ६४ हजार २५० रुपये किमतीचा १३ किलो २८५ ग्रॅम गांजा आढळून आला. दोन्ही ठिकाणचा मुद्देमाल मिळून एकूण १८ किलो ६८६ ग्रॅम गांजा, असा ९ लाख ३४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई दिलीप शिवाजी राक्षे यांच्या फिर्यादीवरून २६ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी भूषण केशव पवार याला २६ ऑगस्ट रोजी पहाटे अटक केली. या कारवाईमुळे चाळीसगाव शहर व परिसरात खळबळ उडाली आहे.

Cannabis Seized Chalisgaon Jalgaon
Jalgaon crime news: कारागृहाच्या भिंतीवर चढून फटाके फोडणे भोवले; वाढदिवसासाठी केला प्रकार, दोघांना अटक

या प्रकरणाचा पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले करीत आहेत. जप्त केलेला गांजा नेमका कुठून आणण्यात आला होता आणि तो कोणाला विकला जाणार होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news