Jalgaon crime | चाळीसगावात वनपाल ७,५०० रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Bribe Case
Bribe CasePudhari
Published on
Updated on

जळगांव : सामाजिक वनीकरण विभागातील वनपालाला ७,५०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी २४ जून रोजी चाळीसगाव येथे करण्यात आली.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लोकसेवक प्यारेलाल विठ्ठल महाजन (वय ५३), वनपाल, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र चाळीसगाव, यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी चाळीसगाव तालुक्यातील मौजे तरवाडे येथील शेतात चंदन वृक्ष लागवड व संवर्धनासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अर्ज केला होता. त्यांचा अर्ज मंजूर होऊन तीन वर्षांसाठी एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता.

Bribe Case
Jalgaon Bribe | सावकारी परवाना मंजुरीसाठी ३० हजारांची लाच घेतली ; सहकार अधिकाऱ्यासह तिघांविरुद्ध 'एसीबी'ची कारवाई

वृक्ष लागवडीसाठी केलेल्या कुशल कामाच्या खर्चाचे बिल सादर करण्यात आले होते. या बिलापैकी ५० हजार रुपयांचे देयक मंजूर करून देण्यासाठी आरोपीने बिलाच्या रकमेच्या १५ टक्के प्रमाणे ७,५०० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली. पडताळणीत लाचेची मागणी निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला. बुधवारी आरोपीने पंच साक्षीदारांसमक्ष ७,५०० रुपयांची लाच स्वीकारताच त्याला रंगेहात पकडण्यात आले.

Bribe Case
Jalna municipal corruption : जालना महापालिकेला लाचखोरीची कीड !

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोलीस हवालदार विनोद चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल अनिल गांगोडे व पोलीस शिपाई योगेश शिंदे यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news