Bhusawal Robbery | भुसावळात पुन्हा घरफोडी; इंजिनिअरच्या घरातून ५.७० लाखांचा ऐवज लंपास

लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून रोकड व दागिने लंपास
Bhusawal Theft Case
Bhusawal Theft Case Pudhari
Published on
Updated on

Bhusawal Theft Case

जळगाव : भुसावळ शहरातील फातेमा कॉलनी परिसरात चोरट्यांनी बंद घराला लक्ष्य करत मोठी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. एका इंजिनिअरच्या घराचे कुलूप तोडून सुमारे ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

मिळालेल्या माहितीनुसार, जैन इरिगेशन येथे इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले वसिम अहमद अब्दुल बासिद शेख (वय ४३) हे कुटुंबासह २८ मार्च रोजी नंदस्वार येथे लग्नासाठी गेले होते. ३० मार्च रोजी पहाटे परतल्यावर त्यांच्या घराच्या कंपाउंडचे गेट उघडे आणि मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला आढळला. घरात प्रवेश केल्यावर हॉल व बेडरूममधील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले.

Bhusawal Theft Case
Bhusawal Crime | भुसावळात भोपाळमधील सराईत गुन्हेगाराला अटक; गावठी पिस्तूल जप्त

चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यातील रोकड व दागिने चोरून नेले. यामध्ये २ लाख २५ हजार रुपयांची रोख रक्कम, सुमारे ४० ग्रॅमपेक्षा अधिक सोन्याचे दागिने (पोत, बाळ्या, रिंगा, अंगठ्या, नथ, मंगळसूत्र) तसेच चांदीचे कॉईन आणि पैंजण असा मुद्देमाल समाविष्ट आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वसिम शेख यांच्या फिर्यादीवरून भुसावळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून, भरवस्तीत झालेल्या या घरफोडीमुळे गस्ती व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news