

जळगाव : जळगावात ममुराबाद रोडवर शिवसेनेच्या माजी महापौर यांच्या एल के फार्म हाऊस येथील इमारतीमध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा टाकला. त्या ठिकाणावरून 31 लॅपटॉप जप्त करण्यात आलेले आहे. या कारवाईत पोलिसांनी माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह एकूण 8 जणांना ताब्यात घेतले असून अटकेची कारवाई सुरू आहे. या ठिकाणी मुंबईवरून तीन जण हे कॉल सेंटर हँडलिंग करत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 27 रोजी पोलिसांना माहिती मिळाली की मुमराबाद रोडवरील एलके फार्मर्स वर बोगस कॉल सेंटर सुरू आहे सदरची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांना दिली असता त्या ठिकाणी योग्य ती कारवाई सूचना मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज 28 रोजी दुपारी एल के फार्म हाऊसवर पोलिसांनी धाड टाकली या धाडीमध्ये एल के फामौस्या एका हॉलमध्ये बोगस कॉल सेंटरचा सेटअप लावलेला मिळून आला त्या ठिकाणी 31 लॅपटॉप पोलिसांना मिळाले त्यामध्ये दोन ते तीन हे लॅपटॉप सुरू असल्याने सदरील लॅपटॉपच्या माहितीनुसार ॲमेझॉन व इतर कंपन्यांच्या नावे रात्री विदेशातील नागरिकांना कॉल करून त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून काही रक्कम ट्रान्सफर केल्याचे दिसून आले आहे. तर या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली असता शहाबाद आलम निशांत नुरी शफिक आलम हासिद रशीद या चार जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहेत.
तसेच फार्म हाऊस वरून नरेश आगरिया चंदू आगरिया राकेश आगरिया याच्यासह मुंबईवरून त्या ठिकाणी जेवण बनवणार असलेला अली गेला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे याचबरोबर मादी महापौर ललित कोल्हे यांना सुद्धा चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत या ठिकाणी मुंबईवरून वीस ते पंचवीस जण काम करीत होते मात्र शनिवार रविवार सुट्टी असल्याने ते सुट्टी घेऊन मुंबईकडे किंवा घरी गेल्याची माहिती मिळालेली आहे अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
तर सदरचे कॉल सेंटर हे मुंबईहून अकबर अली आणि इम्रान यांच्यासह एक जण हँडल करत होता अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली.
*कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी लोकांना संपर्क साधून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना ऑनलाइन पद्धतीने फसविले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
*शिवसेना शिंदे गटात असलेल्या माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीचा हा फार्म हाऊस असून तेच हे कॉल सेंटर चालवत असल्याचा पोलिसांना संशय असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कलकत्ता व वेगवेगळ्या राज्यातील तरुण या ठिकाणी पगारावर काम करत असून त्यांच्या माध्यमातून वेगळ्या ऑनलाईन कंपनीचे नावे सांगून फसवणूक केली जात असल्याचा समोर आला. 20 दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या या कॉल सेंटरच्या या माध्यमातून अनेक विदेशी नागरिकांची लाखो रुपयांत फसवणूक झाल्याची शक्यता असून पोलिस पुढील तपास करत आहेत. या प्रकरणात जळगाव शहरातील तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अशोक नखाते, अप्पर पोलिस अधीक्षक