

जळगाव: 'खेलो इंडिया खेलो...' असे अनेक उपक्रम केंद्र सरकारने खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेले आहेत. मात्र केंद्रीय राज्यमंत्री क्रीडा विभाग हे जळगाव जिल्ह्यात असूनही जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील क्रीडा भवनांची दुरवस्था झालेली आहे. यावल या ठिकाणी तर क्रीडा भवनच नाही. भुसावळ येथे ते क्रीडा भवन आहे मात्र वाट खडतर आहे. मुक्ताईनगरचे म्हणजेच राज्यमंत्र्यांचे आहे, ते पण केंद्रीय आणि तेथील वाट, भवनाची अवस्था वाईटच आहे.
केंद्र सरकारने प्रत्येक राज्यातील खेळाडूंना व ते पण गाव पातळीवरील खेळाडूंना सुविधा मिळाव्या आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी अनेक उपक्रम चालू केलेले आहेत. प्रत्येक तालुक्यात क्रीडा भवन आहे, मात्र ते क्रीडा भवन फक्त नावालाच आहे अशी अवस्था सध्या जळगाव जिल्ह्यातील क्रीडा भावनांची झालेली आहे.
भुसावळ येथील क्रीडा भवन हे वनविभागाच्या व तापी नदी जवळ एक कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आले होते. मात्र त्याची दुरवस्था झाली व ते अजूनपर्यंत हस्तांतरित झाले आहे की, नाही हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. या ठिकाणी आता सात करोड रुपये खर्च करून त्याला लागूनच नवीन क्रीडाभवनाची म्हणजे स्विमिंग पूल व इतर क्रीडा खेळण्यासाठी बांधकाम सुरू आहे. मात्र हे शहराच्या बाहेर पडत असल्याने या ठिकाणी सकाळी व सायंकाळी खेळाडू जाण्यासाठी तयार होतील का? हा ही एक मोठा प्रश्न आहे.
केंद्रीय राज्यमंत्री व तेही क्रीडा यांच्या मुक्ताईनगरमधील तालुका क्रीडा भवनमधील आहे की नाही आहे असा एक प्रश्न उपस्थित होत आहे, तर रावेर तालुक्यातही तीच परिस्थिती आहे तालुक्याच्या बाहेरच्या रस्त्यावर असलेले क्रीडा भवन अतिशय दुरवस्थेत झालेले आहे. या ठिकाणी तर क्रीडा पाहून ही वाहने उभी करण्याची जागा होऊन गेलेली आहे. किडाभवनाच्या मैदानांवर झाड आणि झुडपांनी अतिक्रमण केलेले दिसून येत आहे. यावल तालुक्यात तर क्रीडा भवनाची जागा आहे पण त्यामधून नाला गेला नसल्यामुळे तेथे अजून पर्यंत बांधकाम झालेले नाही.
जळगाव जिल्ह्यातील मुख्य जिल्ह्याचे क्रीडा भवन असलेल्या क्रीडांगणावर सध्या सिंथेटिक ट्रॅकचे काम सुरू असलेले आहेत. सगळीकडे खोदकाम करण्यात आलेले आहे, त्यामुळे खेळाडूंना गेल्या अनेक महिन्यापासून क्रीडांगण उपलब्ध झालेले नाही. जळगाव जिल्ह्यामध्ये होणाऱ्या तालुका किंवा जिल्हास्तरीय स्पर्धा या सध्या इतर खाजगी शाळांच्या मैदानावर किंवा जैन इरिगेशनच्या मैदानावर खेळवल्या जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात क्रीडामंत्री तेही केंद्रीय असतानाही तालुका क्रीडा भवनाची दुरावस्था असल्यामुळे खेळाडूंना कोणत्या सुविधा मिळणार की ते आपल्या प्रतिमा उंचवून देशाचे नाव सातासमुद्रापार फडकवू शकतील.
जिल्हा क्रीडा अधिकारी फक्त कार्यालयात येऊन काही वेळ बसतात नंतर असे कोणते काम करत असतात की त्यांना फोन सुद्धा उचलण्याचा वेळ नसतो. अनेक वेळा संपर्क करूनही ते संपर्कात येत नाही फोन कधी स्वीकारत नाही अशी अवस्था सध्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी आहे. तर क्रीडा भवन मधील एका क्रीडा अधिकारी सचिन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सदर जळगाव जिल्हा क्रीडांगणावर जो सिंथेतिक ट्रॅक बनतोय, त्या संदर्भात आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलावे, कारण ते त्यांच्यामार्फत काम करत आहेत. किती वेळ लागेल कधी ते काम पूर्ण करून देतील याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
यावरून असे दिसून येते की, जळगाव जिल्हा क्रीडा भवन मधील अधिकारी हे क्रीडा या विषयाबाबत किती उदासीन आहेत. गेल्या पाच ते सात महिन्यांपासून क्रीडा भवन जिल्ह्याचे नादुरुस्त म्हणजे तिच्यावर काम सुरू आहे, ते अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जळगाव शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील खेळण्यासाठी खेळाडूंना ग्राउंड उपलब्ध नाहीये यावर कोणीही विचार करताना दिसून येत नाहीये.