

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील बोदवड तहसीलदार तथा तत्कालीन मालेगाव तहसीलदार नितीन कुमार देवरे यांना निलंबित करण्याचे आदेश राज्याचे सहसचिव अजित देशमुख यांनी २३ जानेवारी काढले. यापूर्वीही बोदवड तहसील व तहसील कार्यालय हे नेहमीच वादग्रस्त राहिलेले आहेत. यापूर्वी तहसीलदारांविरोधात या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. (Bodwad Tehsildar suspended)
तत्कालीन मालेगाव तहसीलदार व सध्याला बोदवड तहसीलचे तहसीलदार असलेले नितीनकुमार देवरे यांनी पदावर कार्यरत असताना कार्यालयीन कामकाज शासन निर्देशाप्रमाणे काम न करता आणि शासकीय कामकाजात पुरेशे गांर्भीय न दर्शविता जन्म प्रमाणपत्रे / दाखले निर्गमित केल्यामुळे त्यांनी कर्तव्यात कसूर करुन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम चे उल्लंघन केले. (Bodwad Tehsildar suspended)
त्य़ामुळे नितीनकुमार देवरे यांना तत्काळ प्रभावाने पुढील आदेश होईपर्यंत शासन सेवेतून निलंबित करण्यात येत आहे. शासन असेही आदेश देत आहेत की, पुढील आदेश होई पर्यंत नितीनकुमार देवरे, यांचे निलंबन कालावधीतील मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे उपस्थिती असेल. व त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व संमतीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. त्यांच्या निलंबनाच्या कालावधीत निलंबन निर्वाह भत्ता देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.