

पुढारी ऑनलाईन डेस्क : जळगावातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने काही प्रवाशांनी उडी मारल्या. दररम्यान, बंगळूर एक्स्प्रेसला धडकून १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ३० ते ४० प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना आज (दि. २२) दुपारीच्या सुमारास घडली. रेल्वे अधिकारी आणि इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
सुरुवातीच्या वृत्तांनुसार, पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवांमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि काहींनी जीव वाचवण्यासाठी चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. दुर्दैवाने, ते शेजारील ट्रॅकवर उतरताच, विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसखाली ते चिरडले.