

जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील इगतपुरी ते भुसावळ दरम्यान भादली ते जळगाव पाचव्या रेल्वे मार्गाच्या जोडणीसाठी आणि भादली यार्डच्या पुनर्रचनेसाठी रेल्वे प्रशासनाने ट्रॅफिक ब्लॉक घोषित केला आहे. भादली स्थानकावर चालणाऱ्या या नॉन-इंटरलॉकिंगच्या कामामुळे ११ ते १४ ऑगस्ट दरम्यान रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे.
या ब्लॉकमुळे खान्देशातील प्रवाशांचे मोठे हाल होणार असून भुसावळ-दादर, सुरत, नंदुरबार आणि मेमू धावणाऱ्या १४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर ११ गाड्यांचा मार्ग रोखून (नियमन) धरला जाणार आहे. रेल्वेची क्षमता वाढवणे आणि वाहतूक सुरळीत करणे यासाठी हे काम अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी 'NTES' किंवा 'RailOne' ॲपवर गाड्यांचे स्टेटस तपासूनच बाहेर पडावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
रद्द गाड्या (१२ ऑगस्ट): नंदुरबार-भुसावळ (५९०७५/७६), नाशिक रोड-बडनेरा (०१२१२/११), इगतपुरी-भुसावळ मेमू (११११९/२०), देवळाली-भुसावळ मेमू (११११३/१४), दादर-भुसावळ विशेष (१९००३/०४) आणि भुसावळ-कटनी (१९०१३).
इतर तारखांना रद्द: सुरत-भुसावळ एक्सप्रेस (१९००५ - ११ ऑगस्ट), भुसावळ-सुरत एक्सप्रेस (१९००६ - १४ ऑगस्ट) आणि कटनी-भुसावळ एक्सप्रेस (१९०१४ - १४ ऑगस्ट).
मार्ग बदल (११ ऑगस्ट): हिसार-हैदराबाद एक्सप्रेस (१७०१९) आणि अमृतसर-नांदेड एक्सप्रेस (१२७१६) या गाड्या भुसावळ सी केबिन - अकोला - पूर्णा मार्गे वळवण्यात आल्या आहेत.
रोखून धरलेल्या गाड्या (१२ ऑगस्ट): बंगळुरू-नवी दिल्ली (१ तास ३५ मिनिटे), एलटीटी-गोरखपूर (१ तास ४० मिनिटे), यशवंतपूर-निझामरुद्दीन (१ तास ३० मिनिटे), बनारस-हडपसर अमृत भारत एक्सप्रेस (३ तास) आणि चेन्नई सेंट्रल-भगत की कोठी (२ तास) यासह इतर गाड्या खंडवा, मनमाड आणि अकोला खंडात ताटकळत राहतील.
वेळेत बदल: हडपसर-बनारस एक्सप्रेस (२२५९०) १२ ऑगस्ट रोजी सकाळी ७:५० ऐवजी १०:२० वाजता ३ तास उशिराने सुटेल