Cattle Smuggling: अमळनेर, चोपड्यात गोवंशाची क्रूर वाहतूक; १२ जनावरांची सुटका

या कारवाईत तीन बैल आणि दोन लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन असा एकूण २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
Cattle Smuggling
Cattle SmugglingPudhari
Published on
Updated on

जळगाव : जिल्ह्यात गोवंशाची अवैध आणि क्रूर पद्धतीने वाहतूक होत असल्याचे दोन प्रकार अमळनेर आणि चोपडा शहरात उघडकीस आले. या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण १२ गोवंशाची सुटका करून सुमारे १६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अमळनेर येथे तीन बैलांसह पिकअप, तर चोपडा येथे नऊ गोवंशासह महिंद्रा पिकअप वाहन ताब्यात घेण्यात आले.

Cattle Smuggling
Cattle Smuggling : गुरांची वाहतूक करणारा भडगाव येथील लेझरी डिसोजा हद्दपार

अमळनेरमध्ये तीन बैलांसह पिकअप जप्त

अमळनेर शहरातील गलवाडे रोडलगत ढगुबाई मंगल कार्यालयासमोर ९ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास पोलिसांना बोलेरो पिकअप (एमएच २० ईजी ०९६५) मधून तीन बैलांची दाटीवाटीने वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता बैलांना असहाय्य वेदना होतील अशा पद्धतीने वाहतूक केल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणी चालक किशोर भिका धनगर (२८, रा. धनगर गल्ली, धरणगाव) आणि क्लीनर रोहित वना खैरनार (२१, रा. टोळी, ता. धरणगाव) यांच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा कलम ११(१)(ड), (ई), (फ), (क), भारतीय न्याय संहिता कलम ३(५) तसेच महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत तीन बैल आणि दोन लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन असा एकूण २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ विनोद सोनवणे करीत आहेत. दोन्ही आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.

Cattle Smuggling
Cattle Smuggling Syndicate : गोवंश तस्कर सिंडिकेटचे ५० जण पोलिसांच्या रडारवर

चोपड्यात नऊ गोवंश वाहनासह सोडून चालक पसार

दुसरी घटना चोपडा शहरातील जुना शिरपूर रोडवर हरेश्वर मंदिराच्या पुढे पुलाजवळ घडली. ९ ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास पोलिसांना एक विनाक्रमांकाची पांढऱ्या रंगाची महिंद्रा पिकअप संशयास्पद स्थितीत आढळली. वाहनाचे मागील दोन्ही टायर फुटलेले होते. तसेच पुढील काच, बोनट, कॅबिन आणि इंजिनचे नुकसान झाले असून चालकाच्या बाजूचा दरवाजाही नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ९ गोवंश दाटीवाटीने व क्रूर पद्धतीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. या जनावरांची किंमत सुमारे ४ लाख ३० हजार रुपये, तर वाहनाची किंमत सुमारे १० लाख रुपये असल्याने एकूण १४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहन चालक मात्र वाहन व जनावरे सोडून पसार झाला.

या प्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा कायदा तसेच महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ संतोष पारधी करीत आहेत. दोन्ही कारवायांमध्ये एकूण १२ गोवंशाची सुटका करण्यात आली असून, वाहनांसह १६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news