Cattle Smuggling : गुरांची वाहतूक करणारा भडगाव येथील लेझरी डिसोजा हद्दपार

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यांत प्रवेशास सक्त मनाई
Cattle Smuggling
Cattle SmugglingPudhari
Published on
Updated on

​कुडाळ : कर्नाटकमध्ये मांसाकरिता गुरांची तस्करी करणाऱ्या आणि परिसरात स्वतःची दहशत निर्माण करणाऱ्या भडगाव येथील एका सराईत गुन्हेगारावर प्रशासनाने हद्दपारीची मोठी कारवाई केली आहे. कुडाळजवळील भडगाव - चिऱ्याचाव्हाळ येथील संशयित आरोपी लेझरी पीटर डिसोजा (२८) याला कुडाळ उपविभागीय दंडाधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांच्या हद्दीतून तब्बल दोन वर्षांसाठी हद्दपार (तडीपार) करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये एकच खळबळजनक उडाली आहे.

संशयित आरोपी लेझरी डिसोजा हा गेल्या काही काळापासून कुडाळ, कणकवली, वैभववाडी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रडारवर होता. शेतकऱ्यांकडून गुरे खरेदी करताना त्यांना धमकावणे, दादागिरी करणे आणि परिसरात स्वतःची दहशत निर्माण करणे असे प्रकार तो करत होता. ही खरेदी केलेली गुरे अत्यंत अमानुषपणे आणि अवैध मार्गाने वाहतूक करून मांसासाठी कर्नाटकात पाठवण्याचा गंभीर गुन्हा त्याने सातत्याने केला आहे. या गुरांची तस्करी करताना त्याला यापूर्वी रंगेहात पकडण्यातही आले होते.

केवळ गुरांची तस्करीच नव्हे, तर लेझरी डिसोजा याच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अवैध दारू वाहतुकीचेही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारंवार कायदेशीर कारवाई करूनही त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा होत नव्हती. उलट त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती आणि दहशत वाढतच चालली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news