संतापजनक! अल्पवयीन दिव्यांग मुलीवर बलात्कार

संतापजनक! अल्पवयीन दिव्यांग मुलीवर बलात्कार
A minor disabled girl was raped
संतापजनक! अल्पवयीन दिव्यांग मुलीवर बलात्कार File Photo
Published on
Updated on

जळगाव : पुढारी वृत्‍तसेवा

अल्पवयीन (१७ वर्षीय) दिव्यांग मुलीवर बलात्कार केल्‍याची संतापजनक घटना समोर आली आहे. यातून ती दिव्यांग अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आहे. या प्रकरणी पोक्सो अंतर्गत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A minor disabled girl was raped
जळगाव : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; दोघांवर गुन्हा

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, काही कामानिमित्त जून महिन्यात भुसावळ तालुक्यातील एका शेतात अल्पवयीन तरुणीचा परिवार जामनेर येथून आला होता. ते मुळचे चोपडा तालुक्यातील एका गावात राहणारे असून ते सध्या जामनेर तालुक्यातील एका शेतात परिवारासह राहतात.

A minor disabled girl was raped
Jalgaon Police Promotion | जळगाव जिल्हयातील पोलीस अंमलदाराची पदोन्नती

भुसावळ तालुक्यातील संशयित आरोपी गोपाल भिमसिंग बारेला याने दिव्यांग व अल्पवयीन असलेल्या मुलीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. यामधून ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली.

या प्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक बबन जगताप हे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news