जळगाव : शिवरे येथे २९ मजुरांना पाण्यातून विषबाधा

जळगाव : शिवरे येथे २९ मजुरांना पाण्यातून विषबाधा

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : पारोळा तालुक्यातील शिवरे गावात शेतातील अशुद्ध पाणी पिल्याने २९ मजुरांना विषबाधा झाली. सर्व रूग्णांवर पारोळा कॉटेज रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर आहे. ही घटना आज (दि.९) घडली.

शिवरे गावात मध्यप्रदेशहून शेतमजुरीसाठी आलेल्या २९ जणांनी शेतातील एका ड्रममध्ये अनेक दिवसांपासून साचलेले पाणी पिल्याने विषबाधा झाली असावी, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. २९ जणांपैकी २ जणांवर तामसवाडी आरोग्य केंद्रावर उपचार चालू आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून माहिती घेतली. रूग्णांवर तत्काळ मोफत उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

घटनेचे गांभीर्य ओळखत गटविकास अधिकारी किशोर शिंदे घटनास्थळी दाखल झाले. तालुका आरोग्य अधिकारीसह गटविकास अधिकारी कॉटेज हॉस्पिटल येथे उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. गावातील पाणी नमुने आरोग्य सेवकांनी घेतले आहेत‌. आमदार चिमणराव पाटील यांनीही रूग्णालयात जाऊन रूग्णांची भेट घेत विचारपूस केली आहे.

हेही वाचा 

logo
Pudhari News
pudhari.news