जळगाव: निमड्या येथे तरुणाचा खून; गावाबाहेर आढळला मृतदेह

जळगाव: निमड्या येथे तरुणाचा खून; गावाबाहेर आढळला मृतदेह

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : रावेर तालुक्यातील निमड्या गावातील एका ३२ वर्षीय तरुणाचा गावापासून एक किलोमीटर अंतरावर खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. संजय बारेला (वय ३२, निमड्या, ता. रावेर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सातपुड्यातील निमड्या या आदिवासी भागातील गावापासून काही अंतरावर तरुणाचा खून झाला. संजय बारेला यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, रावेरचे पोलीस निरीक्षक कैलास नगरे, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांनी धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. बारेला यांचा खून कुणी व का केली? याची माहिती अद्याप समोर आलेले नाही.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news