जळगाव : गॅस सिलेंडरच्या अवैध विक्रीचा पर्दाफाश ; तरुणाला ठोकल्या बेड्या

File Photo
File Photo

जळगाव पुढारी वृत्तसेवा : शहरातील एस. टी. वर्कशॉपसमोर कोणताही परवाना नसताना व्यावसायिक कारणासाठी अवैधरित्या गॅस सिलिंडरची विक्री करणाऱ्या तरुणाचा शनिपेठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

या कारवाईत पोलिसांनी गॅस भरण्याची मोटार, तीन सिलेंडरसह, इलेक्ट्रीक वजन काटा असा १२ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तरुणाला अटक केली आहे. मंगेश सुरेश कुंवर वय ३६ रा. लक्ष्मणभाऊ नगर, एसटी, वर्कशॉपसमोर जळगाव असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

एस.टी.वर्क शॉप समोर लक्ष्मण भाऊ नगरात मंगेश कुंवर हा तरुण अवैधपणे गॅस सिलेंडर भरुन व्यावसायिक कारणासाठी त्याची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक बळीराम हिरे यांना मिळाली. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पथकाने सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी २ हजार ९१० रुपयांचे भरलेले सिलेंडर, ४ हजार रुपयांचे दोन अर्धवट भरलेले सिलेंडर, गॅस भरण्याची इलेक्ट्रीक मोटार, इलेक्ट्रीक वजन काटा असा १२ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संशयित मंगेश कुंवर यास अटक करण्यात येवून त्याच्याविरोधात शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक सुरेश सपकाळे हे करीत आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news