जळगाव: विद्यार्थ्याच्या दफ्तरात गावठी कट्टा आढळल्याने खळबळ

जळगाव: विद्यार्थ्याच्या दफ्तरात गावठी कट्टा आढळल्याने खळबळ

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: यावल तालुक्यातील एका शाळेमध्ये इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडे गावठी कट्टा आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संशयित विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरापासून जवळच असलेल्या अकलूद (ता. यावल) येथील एका शाळेमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. भुसावळातील रहिवासी असलेला इयत्ता नववीतील विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेतो. शिक्षकांनी नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या दफ्तराची तपासणी केली. तेव्हा संबंधित विद्यार्थ्याच्या दफ्तराची तपासणी केली असता, त्यात गावठी कट्टा आढळून आला. त्यामुळे सर्वांना धक्का बसला. याबाबत मुख्याध्यापक आनंद शहा यांनी दिलेल्या फिर्यार्दीवरुन फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी शाळेत भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रभाकर चौधरी करीत आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news