जळगाव : अमळनेर दंगलीतील संशयिताचा मृत्यू | पुढारी

जळगाव : अमळनेर दंगलीतील संशयिताचा मृत्यू

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : अमळनेर येथे उसळलेल्या दंगलीतील संशयिताचा बुधवारी (ता. १४) रात्री रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेनंतर अमळनेरमध्ये दंगलीची अफवा पसरविण्यात आली, मात्र तसा कोणताही प्रकार नसून शांतता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिस यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.

अमळनेर शहरात दंगल झाल्याची घटना गेल्या चार दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी २९ आरोपींना अटक केली होती. १३ आरोपींना १४ पर्यंत पोलिस कोठडी, तर १८ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. अमळनेरचे माजी नगरसेवक सलीम टोपी यांच्यासह त्यांचा मुलगा अशपाक ऊर्फ पक्या सलीम शेख (वय ३३, रा. गांधलीपुरा, अमळनेर) यालादेखील आरोपी करण्यात आले होते. अशपाक याला पोलिसांनी अटक केली होती.

संशयित अशपाक हा पोलिस कोठडीत असताना त्याला उपचारासाठी दि. १३ रोजी जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिल्हा वैद्यकीय रुग्णालयातील कैदी वॉर्डात उपचार झाल्यानंतर त्याला अत्यवस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. बुधवारी रात्री उपचार घेताना अशपाक याचा मृत्यू झाला

Back to top button