धुळेकरांची हेळसांड टळणार, अखेर जिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन २०० खाटांमध्ये; मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी

धुळेकरांची हेळसांड टळणार, अखेर जिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन २०० खाटांमध्ये; मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जुन्या जिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन २०० खाटांमध्ये करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. श्रेणीवर्धन करण्याच्या प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आ.फारूक शाह गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करत होते.

धुळे शहरातून वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय शहरातून स्थलांतरित झाल्यावर शहरातील नागरिकांची हेळसांड होत होती. म्हणून जुन्या जिल्हा रुग्णालयाचे  सक्षमीकरण व्हावे यासाठी आ. फारुख शाह सातत्याने प्रयत्नरत होते. २०२४ च्या हिवाळी अधिवेशनात सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या दालनात विशेष बैठक आयोजित करून आ. शाह यांनी श्रेणीवर्धन करण्याच्या प्रश्न ऐरणीवर आणला होता. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी श्रेणीवर्धन प्रस्ताव मान्य करण्याचे अभिवचन दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रेणीवर्धन प्रस्तावास मंजुरी देवून आ.फारूक शाह यांना वाढदिवसाची भेट दिली आहे.

सद्यस्थितीत शहरातील जुने जिल्हा रुग्णालय १०० खाटा अस्तित्वात असून स्त्री-पुरुष वैद्यकीय विभाग, नेत्र चिकित्सा विभाग, मनोरुग्ण विभाग अतिदक्षता विभाग व ऑपरेशन थियटर यासाठी  सुमारे १३७ प्रशिक्षित कर्मचारी वर्ग मंजूर असून ७३ कंत्राटी कर्मचारी वरील विभागात कार्यरत आहेत. १००  खाटांचे २०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन झाल्यामुळे नाक-कान-घसा सारखे  नवीन विभाग कार्यरत होवून कर्मचारी संख्या दुप्पट होईल त्यामुळे धुळेकर नागरिकांची हेळसांड होणार नाही आणि रुग्ण सुविधेसाठी शहरापासून ९ कि.मी. लांब असलेल्या वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयावर  अवलंबून रहावे लागणार नाही. जुन्या जिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन २०० खाटांमध्ये झाल्यामुळे शहरातील नागरिकांनी आ.फारुख शाह यांना धन्यवाद दिले आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news