Shobha Bachhao Viral Call | खासदार शोभा बच्छाव यांच्या व्हायरल फोन रेकॉर्डिंगची चौकशी करण्याची मागणी

Shobha Bachhao Viral Call | खासदार शोभा बच्छाव यांच्या व्हायरल फोन रेकॉर्डिंगची चौकशी करण्याची मागणी
Published on
Updated on

धुळे : पुढारी वृत्तसेवा- मालेगाव येथील बाजार समितीत पोलिसांनी ताब्यात घेतलेलं एक कोटी रुपये किमंतीचे गोवंश कत्तलीसाठी परत करावेत, असे साकडे खासदार शोभा बच्छाव यांना घालण्यात आले आहे. मालेगांव येतील मन्सूर नावाच्या नगरसेवकाच्या भावाने खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांना केलेला फोन कॉल ची रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे.  या रेकॉर्डिंग संदर्भात तातडीने चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे धुळे विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल यांनी केले आहे. या फोन कॉल वरून त्यांनी काँग्रेस आणि खासदार बच्छाव यांच्यावर टीका देखील केली आहे.

या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल यांनी खासदार शोभा बच्छाव यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मालेगाव येथील नगरसेवकाच्या भावाने खासदार बच्छाव यांना तुम्ही केवळ मालेगावच्या मतांमुळेच खासदार झाला आहात, असे खडेबोल सुनावले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी भारती यांच्याशी मी बोलते, असे खासदार शोभा बच्छाव म्हणतात. यावरून खासदार शोभा बच्छाव या कशा मुस्लीम धार्जिण्या आहेत हे स्पष्ट होते, अशी टिका भारतीय जनता पक्षाच्या धुळे शहर विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल यांनी केली आहे. याबाबत खासदार बच्छाव यांनी सर्व हिंदू बंधू-भगिनींची जाहीर माफी मागावी, अशी मागणी देखील अनुप अग्रवाल यांनी केली आहे.

शोभा बच्छाव मुस्लीम धार्जिण्या असल्याचा आरोप

बकरी ईद हा सण १७ जूनला होता. या दिवशी बकऱ्याचा बली दिला की पुण्य लाभते, अशी मुस्लीमांची धारणा आहे. या पार्श्वभूमीवर मालेगाव येथील मन्सूर नगरसेवकाचा भाऊ आणि धुळे लोकसभा मतदार संघाच्या खासदार शोभा बव्छाव यांच्यात मोबाईलवर झालेला संवाद सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हायरल संभाषणाच्या आधारे भाजपचे धुळे विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल यांनी या टेलिफोन कॉल च्या घटनेची टीका केली आहे. अनुप अग्रवाल यांनी खासदार शोभा बच्छाव मुस्लीम धार्जिण्या आहेत, असा आरोप केला आहे. त्यासाठी त्यांनी मालेगाव येथील संभाषणाचा आधार घेतला आहे. मालेगाव येथील बाजार समितीत बकरी ईदच्या अगोदर कत्तलीसाठी आणण्यात आलेले गोवंश पोलिसांनी ताब्यात घेतले. सुमारे एक कोटी किंमतीची ही जनावरे सोडून देण्यात यावीत, यासाठी मदत करा अशी साद नगरसेवक मन्सूरचा भाऊ खासदार शोभा बच्छाव यांना घालतो. त्याचवेळी तो खासदार शोभा बच्छाव यांना आई मानतो, असेही सांगतो. धुळे लोकसभा मतदार संघातील पाच विधानसभा मतदार संघात तुम्ही पराभूत झाला आहात. केवळ मालेगाव शहराच्या मतांमुळे तुम्ही निवडून आल्या आहेत. अशी जाणीव देखील संभाषणातून खासदार बच्छाव यांना करून देण्यात आली आहे. कष्टाच्या पैशांनी आम्ही मुस्लीमांनी जनावरे आणली आहेत. ईदच्या दिवसाअगोदर जर जनावरे मिळाली नाहीत तर कुर्बानी होणार कशी, असा प्रश्नही संबधीत खासदार शोभा बच्छाव या कशा मुस्लीम धार्जिण्या आहेत, हे वेगळेपणाने सांगण्याची गरज नाही. ईदच्या दिवशी बळी द्यायचा असेल तर बोकडाचा दिला पाहिजे. बळी देण्यासाठी गाय किंवा गोवंशच का हवा असतो, त्याचे स्पष्टीकरण देणार का, असा प्रश्न अनुप अग्रवाल यांनी उपस्थित केला आहे.

अग्रवाल यांचा दावा

धुळे शहरातील गल्ली क्रमांक ५ व ६ , ऐंशी फुटी रस्ता, शंभर फुटी रस्ता आणि त्या भागातून वाहणाऱ्या नाल्याची पाहणी केल्यास आज मृत जनावर यांचे अवशेष दिसून येतील असा दावा अग्रवाल यांनी केला आहे.

गोवंशाच्या कत्तलीमुळे शहरातील धार्मिक सलोखा बिघडविण्यास आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडविण्यास कॉंग्रेसच्या खासदार शोभा बच्छाव या मदत करीत आहेत, याची नोंद प्रशासनाने घेतली पाहिजे. गोवंशाच्या हत्येसाठी मदत व्हावी म्हणून पोलिस अधिकाऱ्यांशी बोलते, त्यात धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,उप अधिक्षक ऋषीकेश रेड्डी या दोघी अधिकाऱ्यांनी कोणाचेही न एकता त्यांनी त्यांचे कर्तुत्व पार पाडले. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवले. त्याबद्दल सर्व धुळे व मालेगाव पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन तसेच प्रशासनातर्फे गोवंश कायदा राबवण्यात येत आहे. या कायद्याची अंमलबजावनी प्रशासनातर्फे होत आहे. तरीही सामान्य जनतेने गोवंश थांबव्ण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कडील आदेशान्वये पशु पालक,व्यापारांनी आपल्या जवळच्या पशु वैद्यकीय दवाखान्यातून जनावरांच्या कानाला बिल्ला (१२ अंकी इअर टेग) पशु आधार कार्ड याची ऑनलाइन नोंदणी करावी ,जेणेकरून खरेदी विक्री किंवा गो-तस्करी सापडल्यास त्याच्यावर पोलीस प्रशासन कारवाही करता येईल, असेही अग्रवाल यांनी म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news