Shivrajyabhishek Sohala: धुळ्यात सकल मराठा समाजतर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सकल मराठा समाज धुळे तर्फे उत्साहात साजरा करण्यात आला.
Shivrajyabhishek Sohala
Shivrajyabhishek SohalaPudhari
Published on
Updated on

धुळे: धुळ्यात सकाळ मराठा समाजाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने पुतळ्याला अभिषेक करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आज प्रत्येकाने वाटचाल करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सकल मराठा समाज धुळे तर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त धुळे शहरातील मनोहर चित्र मंदिर जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सकल मराठा समाजातर्फे अभिषेक करण्यात आला.

Shivrajyabhishek Sohala
Dhule HTBT Cotton Seeds | वाघाडी येथे प्रतिबंधित HTBT कापूस बियाण्यांचा साठा जप्त: दोघांविरुद्ध गुन्हा

तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पमाळ अर्पण करून सामुहिक अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय आदी घोषणांनी परिसरत दणाणून गेला होता.

यानंतर सुधाकर बेंद्रे यांनी आपले मत व्यक्त केले की, आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चालणे खूप गरजेचे आहे. तसेच समाजाने संघटीत राहून एकत्रित होणे ही काळाची गरज आहे.

Shivrajyabhishek Sohala
Dhule Gutka Seized | सोनगीरजवळ १८ लाखांचा गुटखा जप्त

छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम केले. त्याचप्रमाणे आपण देखील इतरांना मदत करीत रहायले हवे, समाजातील गोरगरीब, वंचित, दुर्बल घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करायला हवे असे मत यावेळी सुधाकर बेंद्रे यांनी व्यक्त केले.

यावेळेस सकल मराठा समाजाचे भानुदास बगदे, विनोद जगताप, राजेंद्र काळे, निंबा मराठे, संजय शेंडे, उल्हास यादव, मनोज ढवळे, विकास बाबर, अतुल सोनवणे, किशोर वाघ, श्रीराम जाधव, सुनिल वरपे, सुनील पाटील, भैया शिंदे, पप्पू माने, दिपक रौधळ, अशोक बाबर, सुनिल ठाणगे, श्याम निरगुडे, उल्हास पाटील, राकेश भोसले, बापू कदम, संभा पाटील, विकी पाटील, गजानन हरणे आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news