Dhule Gutka Seized | सोनगीरजवळ १८ लाखांचा गुटखा जप्त

सोनगीर पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
Illegal Gutka Raid Songir
Illegal Gutka Raid SongirPudhari
Published on
Updated on

Illegal Gutka Raid Songir

सोनगीर (धुळे) : धुळे जिल्ह्यातील सोनगीर गावाजवळ अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला तब्बल १८ लाख ५० हजार रुपये किंमतीचा पानमसाला, व्ही-१ तंबाखू आणि इतर प्रतिबंधित असलेला अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे.

सोनगीर पोलिस ठाण्याच्या मदतीने ही धडक कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहआयुक्त करकाळे व सहाय्यक आयुक्त जी. वी. महोरे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

Illegal Gutka Raid Songir
Dhule crime | धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात प्रतिबंधित गुटखा साठ्यावर कारवाई

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, सोनगीर पोलिसांच्या मदतीने एका संशयास्पद वाहनाची वाहन क्रमांक:- HR 55 AE 6821 तपासणी करण्यात आली. या वाहनातून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला विमल पानमसाला आणि व्ही-१ तंबाखूची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले.

प्रशासनाने तत्परता दाखवत एकूण १८ लाख ५० हजार किमतीचा हा साठा जप्त केला. या बेकायदेशीर वाहतूक प्रकरणी वाहन चालक सुरेशकुमार बिरबलराम गुवरिया रा. राजस्थान याच्याविरुद्ध सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Illegal Gutka Raid Songir
Dhule Bribe Case : धुळ्यात ACBचा धडाका; ज्वारीचा उच्च दर्जा दाखवण्यासाठी ५ हजारांची लाच घेणा-या पुरवठा निरीक्षकाला अटक

राज्यात प्रतिबंध असलेला गुटखा पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन , साठवणूक , विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सातत्याने मोहीम राबून कारवाई केली जात आहे. भविष्यातही अशा कारवाया अधिक तीव्रतेने सुरू राहतील , असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

ही यशस्वी कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी ए. बी. पवार, एस. बी.राणे आणि धुळे अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त जी. वि. माहोरे यांच्या पथकाने पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news