धुळे शहरातील पाणीटंचाईवरुन शरद पवार गटाचा आंदोलनाचा इशारा

धुळे शहरातील पाणीटंचाईवरुन शरद पवार गटाचा आंदोलनाचा इशारा

धुळे: पुढारी वृत्तसेवा- धुळे शहरात भिषण पाणी टंचाई निर्माण झाली असून महानगरपालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याचे नियोजन कोळमडले आहे. त्यामुळे आज दि. 28 राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तांसमोर आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. हा पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

धुळे शहरातील पाणीटंचाई व पाण्याच्या संदर्भात असलेल्या अडचणी बाबत आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाच्या शिष्टमंडळाने रणजीत भोसले व जोसेफ मलबारी यांच्या नेतृत्वामध्ये धुळे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त यांची भेट घेतली. धुळे शहरांमध्ये या उन्हाळ्यामध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. काही भागांमध्ये आठ – आठ दिवस पाणी येत नाही. ज्या भागांमध्ये पाणी येते. ते गढुळ आणि खराब येते आहे. ठीक ठिकाणी जल वाहिन्या खराब झालेले आहेत. अक्कलपाडा धरणातील आलेले पाणी पूर्ण क्षमतेने मिळत नाही. मोहाडी सारख्या भागांमध्ये महिन्यातून फक्त दोनदा पाणी मिळालेले आहे. शेकडो करोडो रुपयाचे निधी हा पाणीपुरवठ्यासाठी योजना आणण्याचा भाजपचा दावा फोल ठरलेला आहे. भाजपाने शब्द दिला होता की, एका दिवसाआड किंवा दररोज पाणी देऊ. पण आज धुळे शहरातील नागरिकांना सात ते आठ दिवसानंतर पाणी मिळत आहे. कॉलनी परिसरामध्ये तर पाणी मिळावे, म्हणून काही कर्मचारी रजा टाकून घरी राहत आहे. भाजपाने धुळे शहरातील नागरिकांची फसवणूक केली आहे. धुळे महानगरपालिकेतील प्रशासक, अधिकारी कर्मचाऱ्यांनी भाजपच्या दबावाखाली काम करू नये. धुळे शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करावा,वेळेवर व शुद्ध पाणीपुरवठा करावा. अशी मागणी यावेळेस धुळे शहर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाच्या शिष्टमंडळाने केली.

यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रणजीत भोसले, जोसेफ मलबारी, राजेंद्र सोलंकी, राजू डोमाळे, अशोक धुळकर,वाल्मीक मराठे, डी.टी पाटील,दीपक देवरे, जयश्री घाटे, भिका नेरकर, बरकत शाह,राजू चौधरी,राजेंद्र चौधरी,बंटी वाघ , आकाश वैसाने ,गोलू नागमल, भूषण पाटील, दीपक देवरे,सलमान खान, सोनू गुजर, सोनू घारू, युसुफ शेख,निखिल मोमया, भटू पाटील,कल्पेश मगर, जीवन चव्हाण, रामेश्वर साबरे,बंटी बोरसे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news