

Jai Saptashrungi Mata Rath Yatra
धुळे: श्री सप्तशृंगी देवीच्या यात्रोत्सवानिमित्त अवघ्या खानदेश आणि मध्यप्रदेशातून पायी निघालेल्या भाविकांच्या जय घोषामुळे धुळे शहरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या निमित्ताने वेगवेगळ्या दिंड्या शहरात दाखल होत असून शिरपूर शहरातील मानाच्या रथाचे देखील देवपूर परिसरात आगमन झाले आहे. शिरपूर नगरीचे प्रसिद्ध गायक व खानदेश भूषण आबासाहेब चौधरी यांच्या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सप्तशृंगी माता पदयात्रेचा मानाचा रथ आज धुळे शहरात आगमन झाला.
देवपूर परिसरातील नगरसेवक ललित गंगाधर माळी यांच्या निवासस्थानानजीक मैदानात या मानाच्या रथाचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. धुळे महानगरपालिकेच्या महापौर मायावती महादेव परदेशी यांच्या हस्ते मानाच्या रथाचे पूजन व स्वागत करण्यात आले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगाधर लोटन माळी, प्रदेश महामंत्री सुशील महाजन, सामाजिक कार्यकर्ते रणजीत भोसले, नगरसेविका निशा महाजन, धीरज सुभाष जगताप, स्वामी संजय कुटे, नगरसेविका कविताताई सोनवणे, अमोल मराठे यांच्यासह परिसरातील हजारो नागरिकांनी या मानाच्या रथाच्या स्वागत सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
मागील २४ वर्षांपासून हा मानाचा रथ शिरपूरहून शेकडो भाविकांसह पायी सप्तशृंगी माता गडाकडे जात आहे. या रथातील आई सप्तशृंगी मातेच्या दर्शनाने व मानभावे केलेल्या प्रार्थनेने मनोकामना पूर्ण होते, अशी धुळे शहरासह संपूर्ण खानदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे.
या सोहळ्याचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रभावी पद्धतीने पार पाडण्यात आले. हरीश माळी व त्यांच्या मित्र परिवाराने संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. यामध्ये चंद्रकांत माळी, हेमंत माळी, संदीप माळी, तुषार आढावे, आनंद माळी, राम माळी, ऋषिकेश महाजन, दीपेश माळी, वैभव देव, कृष्णा मांडे, सिद्धेश नाशिककर, स्वप्निल बोरसे, रोहित अमृतकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
“जय सप्तशृंगी माता” च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि भक्तीमय वातावरणात हा सोहळा अविस्मरणीय ठरला.