पिंपळनेर : साक्रीचे प्रा. नरेंद्र तोरवणे यांचा पानिपत येथे गौरव

पिंपळनेर : पानिपत येथे प्रा.नरेंद्र तोरवणे यांचा सन्मान करतांना मराठा समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश पाटील सोबत मान्यवर.
पिंपळनेर : पानिपत येथे प्रा.नरेंद्र तोरवणे यांचा सन्मान करतांना मराठा समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश पाटील सोबत मान्यवर.

पिंपळनेर, जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा
ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांच्या आर्थिक उन्नतीसाठी केलेल्या विशेष योगदानाबद्दल पानिपत येथील 'स्वराज्य जनक' परिवारातर्फे येथील न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य प्रा. नरेंद्र तोरवणे यांचा विशेष गौरव करण्यात आला.

मराठा समन्वय परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश पाटील यांच्या हस्ते स्वराज्य जनक परिवारातर्फे शिवप्रतिमा व शिवधर्म गाथा भेट देऊन प्रा. नरेंद्र सोनवणे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी मराठा समुदाय परिषदेचे उत्तर भारतातील ज्येष्ठ प्रतिनिधी बलवान लाथेर, डॉ. फत्तेसिंह कृष्णालाल मराठा तसेच साक्री तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक मधुकर ठाकरे, दिलीप ठाकरे, तय्यबअली सय्यद आणि परिषदेचे कार्यालयीन सचिव प्रवीण मोरे आदी उपस्थित होते. प्रा. नरेंद्र तोरवणे यांच्या विशेष योगदानाची दखल घेऊन त्यांना 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिन सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी पानिपत येथील मराठा समन्वय परिषदेने निमंत्रित करून त्यांचा विशेष गौरव केला.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news