

पिंपळनेर (धुळे) : नारळी सप्ताह निमित्त नियोजित असलेला राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा पिंपळनेर दौरा काही तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात झाला आहे.
मुंडे हे गुरुवार (दि.17) रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मुंबई विमानतळावर उपस्थित होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे त्यांचे उड्डाण होऊ शकले नाही. त्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याचे त्यांनी स्वतः ट्विट करून जाहीर केले आहे.
नारळी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याकडे अनेकांची उत्सुकता लागली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.