पिंपळनेरला दहीहंडीची धूम, सौरभ बेनुस्कर ठरले गोविंदा

पिंपळनेरला दहीहंडीची धूम, सौरभ बेनुस्कर ठरले गोविंदा

पिंपळनेर पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेरमध्ये दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी आमदार मंजुळा गावित, सरकार गृपचे अध्यक्ष उदय (बंटी)चौरे, रुपाली जोगी, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे, सपोनी.श्रीकृष्ण पारधी, उपनिरीक्षक अमित माळी, भूषण शेवाळे, ऍड.ज्ञानेश्वर एखंडे, पं.स.सदश्य देवेंद्र गांगुर्डे, संभाजी अहिरराव, रिखबशेठ जैन, प्रमोद भावसार, जावेद सैय्यद, अंकुश पाठक, नासिर सैय्यद, सुभाष नेरकर, आजी-माजी पदाधिकारी आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली.

सामोडे रोडवरील सरकार हॉटेल समोरील मैदानावर सरकार मित्र परिवारातर्फे भव्यदिव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दहिहंडी फोडण्यासाठी येथील युवा संघर्ष मित्र मंडळ, जय बजरंग ग्रूप, कोळीराजा ग्रूप, संतोषी माता मित्र मंडळ या चार गोविंदा पथकांना निमंत्रीत करण्यात आले होते. चारही पथकांमध्ये चुरस पहावयास मिळाली.

रात्री अकरा वाजेच्या सुमारास युवा संघर्ष मित्र मंडळाचे अध्यक्ष सौरभ अंबादास बेनुस्कर यांच्या पथकाने दहीहंडी फोडली. यावेळी आमदार मंजुळा गावित, उदय (बंटी)चौरे, सरकार मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते. विजयी पथकाला आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते रोख रक्कम 33,333 आणि ट्रॉफी देण्यात आली.

यावेळी सरकार मित्र परिवाराचे अध्यक्ष उदय (बंटी)चौरे, सदस्य विकी वाघ, प्रशांत नेरकर, बबलू शेख, बाळा चौरे, अश्विन राठोड, राहुल बहिरम, गौरव भामरे, दीपक गावित, केतन अहिरे, सागर वाघ, प्रशांत सूर्यवंशी, अमित सूर्यवंशी, रोहित बेनुस्कर, सनी ठाकरे, तुषार जैस्वाल, शेखर सूर्यवंशी, रोहित मोहिते, विशाल सोनवणे, मयुर मोरे, हर्षल सोनवणे, प्रतीक वानखेडे‌ यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news