Jaykumar Rawal | दोंडाईचा येथे मॅग्नेट 2.0 प्रकल्पातून राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेचे उपकेंद्र उभारणार - पालकमंत्री

धुळे जिल्ह्यासह खानदेशातील शेतकऱ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि आधुनिक प्रक्रिया पद्धतींचे प्रशिक्षण
Dhule under MAGNET 2.0 project
Dhule under MAGNET 2.0 projectPudhari
Published on: 
Updated on: 

Dhule under MAGNET 2.0 project

धुळे: शेतमालाची काढणीनंतर होणारी नासाडी कमी करणे, उत्पादनाचा दर्जा टिकविणे आणि मूल्यवर्धनातून शेतकऱ्यांना अधिक चांगला बाजारभाव मिळवून देण्यासाठी धुळे जिल्ह्यात महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येणार आहे. मॅग्नेट 2.0 प्रकल्पाच्या माध्यमातून दोंडाईचा येथे राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेचे उपकेंद्र (सब-सेंटर) स्थापन करण्यात येणार आहे.

या उपकेंद्रामुळे धुळे जिल्ह्यासह संपूर्ण खानदेशातील शेतकऱ्यांना जागतिक दर्जाचे सुगीपश्चात तंत्रज्ञान, आधुनिक कृषी प्रक्रिया पद्धती आणि शेतमाल मूल्यवर्धनाचे प्रशिक्षण स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

पुणे येथे राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेचा प्रगत देशांच्या धर्तीवर अत्याधुनिक विकास करण्यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री रावल यांनी ही माहिती दिली.

Dhule under MAGNET 2.0 project
Dhule News : पवित्र पोर्टलद्वारे धुळे जिल्हा परिषदेत 67 शिक्षण सेवकांना नियुक्ती!

शेतमालाची काढणीनंतर योग्य हाताळणी, साठवणूक, प्रतवारी, प्रक्रिया, पॅकेजिंग आणि मूल्यवर्धन या बाबींना आधुनिक कृषी पणन व्यवस्थेत विशेष महत्त्व आहे. या क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण सुविधा खानदेशातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दोंडाईचा येथील प्रस्तावित उपकेंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतमालाचे काढणीनंतर होणारे नुकसान कमी होऊन उत्पादनाचा दर्जा टिकविण्यास आणि शेतकऱ्यांना बाजारपेठेत अधिक चांगला भाव मिळविण्यास मदत होईल, असे पालकमंत्री रावल यांनी सांगितले.

या उपकेंद्राच्या माध्यमातून शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी पदवीधर तसेच कृषी प्रक्रिया उद्योगांशी संबंधित घटकांना आधुनिक सुगीपश्चात तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. शेतमालाच्या प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, मूल्यवर्धनाला चालना देणे आणि कृषी प्रक्रिया उद्योगांच्या विकासासाठी आवश्यक कौशल्ये स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

Dhule under MAGNET 2.0 project
Dhule News : धुळ्यात आराम बस मधून वाहतूक होणारा संशयित खव्याचा साठा जप्त

शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर प्रशिक्षण

मॅग्नेट 2.0 प्रकल्पातून कृषी पणन क्षेत्रातील पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे नियोजन आहे. दोंडाईचा येथे प्रस्तावित उपकेंद्र सुरू झाल्यानंतर धुळे जिल्ह्यासह खानदेशातील शेतकऱ्यांना सुगीपश्चात तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासाठी दूरच्या संस्थांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होणार आहे. स्थानिक पातळीवरच अत्याधुनिक प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होऊन शेतमालाचे मूल्यवर्धन, कृषी प्रक्रिया उद्योगांचा विकास आणि आधुनिक कृषी पणन व्यवस्थेच्या विस्ताराला चालना मिळेल, असा विश्वास पालकमंत्री रावल यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून त्यांच्या शेतमालाचे मूल्य वाढविण्याच्या दृष्टीने दोंडाईचा येथील हे उपकेंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचेही पालकमंत्री रावल यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news