Dhule News : पवित्र पोर्टलद्वारे धुळे जिल्हा परिषदेत 67 शिक्षण सेवकांना नियुक्ती!

Teacher
प्रातिनिधीक छायाचित्रPudhari
Published on: 
Updated on: 

धुळे : सेवा संकल्प अभियानातर्गत धुळे जिल्हा परिषदेत पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक पदासाठी फेज-1 (कन्व्हर्टेड राऊंड) अंतर्गत प्राप्त झालेल्या यादीतील 68 उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर पात्र ठरलेल्या 67 उमेदवारांना जिल्हा परिषदेतील कै. यशवंतराव चव्हाण सभागृह येथे समुपदेशन प्रक्रियेद्वारे त्यांच्या पसंतीनुसार शाळांवर पदस्थापना देण्यात आली. तसेच संबंधित उमेदवारांना नियुक्ती आदेशही प्रदान करण्यात आले, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वैभव बाचकर यांनी दिली आहे.

धुळे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या उमेदवारांची शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया पार पडली.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत साबळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वैभव बाचकर, उपशिक्षणाधिकारी प्रमोद सोनार, चारही तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी ज्योती पाटील, कनिष्ठ प्रशासन अधिकारी बबिता पटले, लक्ष्मीकांत वाघ, प्रवीण चौधरी, भानुदास पाटील, रविंद्र बोरसे, तुषार दीक्षित, संदीप सोनवणे आदींनी भरती प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news