Murder|धक्कादायक ! सोन्याच्या बाळीसाठी कान कापून वृद्धाची हत्या

बलवंड शिवारातील घटनेने खळबळ
Murder
सोन्याच्या बाळीसाठी कान कापून वृद्धाची हत्या करण्यात आली आहे. Pimpalner Correspondent

पिंपळनेर(जि. धुळे) साक्री तालुक्यातील इंदवे येथील 78 वर्षीय वृद्धाचा कानातील सोन्याच्या बाळीसाठी ब्लेडने कान कापून त्याची डोक्यावर वार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संशयिताने 7 ग्रॅम सोन्याच्या बाळीसाठी वृद्धाचे ब्लेडने कान कापून नेत डोक्यावर वार करुन निर्घूण हत्या केल्याची ही घटना नंदुरबार तालुक्यातील बलवंड शिवारात घडली.

  • 7 ग्रॅम सोन्याच्या बाळीसाठी वृद्धाचे ब्लेडने कान कापून हत्या करण्यात आली.

  • घटनास्थळी ब्लेड आढळून आले आहे.

  • दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

  • मारेकऱ्यांच्या शोधासाठी तालुका पोलिसांनी पथक रवाना केले आहे.

Murder
कवलापुरात हल्लेखोर तरुणाचा जमावाकडून खून

आधी कान कापले नंतर डोक्यात केला वार

या घटनेने परिसरात खळबळ माजली असून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारेकऱ्यांचा पोलीसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे. साक्री तालुक्यातील ऐचाळे येथील भटा मखन बोरसे यांचे नंदुरबार तालुक्यातील बलवंड शिवारात शेत आहे. याच शेतात त्यांनी पत्र्याचे घर बांधले आहे. भटा बोरसे बऱ्याचदा शेतातच राहत होते. त्यांच्या कानात 7 ग्रॅम वजनाची सोन्याची बाळी होती. 26 जूनच्या सकाळी 8.30 वाजेदरम्यान मारेकऱ्याने त्यांच्या कानातील सोन्याच्या बाळीसाठी संधी साधत ब्लेडने त्यांचे कान कापले व काहीतरी वस्तुने त्यांच्या डोक्यावर वार करुन जीवेठार केले.

कधी घडलं?

दरम्यान सदरची घटना काल सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. 78 वर्षीय भटा बोरसे यांचा खून झाल्याचे समजताच घटनास्थळी गर्दी झाली होती. याबाबत नंदुरबार तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर घटनास्थळी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारात तालुका पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा केल्यानंतर भटा बोरसे यांचा मृतदेह नंदुरबार जिल्हा रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

गावाचत मृत भटा बोरसे यांचा मुलगा अशोक बोरसे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news