Dhule Politics : नवीन पुलाला केंद्राची मंजुरीच नाही; खासदार बच्छाव यांच्याकडून धुळेकरांची दिशाभूल

आमदार अनुप अग्रवाल यांचा आरोप
Dhule Politics
आमदार अनुप अग्रवाल
Published on
Updated on

धुळे : शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीवर वीर सावरकर पुतळा ते ज्योती चित्रपटगृहापर्यंत नवीन पूल होणार आहे. त्यासाठी केंद्रीय नितीन गडकरी यांच्याकडून मंजुरी मिळाल्याच्या खोट्या बातम्या प्रसिद्ध करत विद्यमान खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडून धुळेकरांची दिशाभूल केली जात आहे. केंद्राकडून अशी कुठलीच मंजुरी मिळालेली नसून, खासदारांकडून आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप धुळ्यातील आमदार अनुप अग्रवाल यांनी केला.

Dhule Politics
Sindhudurg Politics | मित्र पक्षाला त्रास होणार नाही याची दक्षता घ्या!

शहरातील वीर सावरकर पुतळा ते ज्योती चित्रपटगृहापर्यंत नवीन पूल बांधण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निधीसह मंजुरी दिल्याचे दिशाभूल करणारी माहिती खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी देऊन आत्मस्तुती करणारी प्रसिद्धी पदरात पाडून घेतली. वास्तविक, पांझरा नदीवरील ब्रिटिशकालीन लहान पुलाच्या ठिकाणी मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी नोव्हेंबर २०२२ च्या अर्थसंकल्पात ९ कोटी रुपयांची निधी मंजूर आहे. याबाबत राज्य शासनाच्या मुंबई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकल्प चित्र मंडळ (पूल) विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडून सध्या अस्तित्वात असलेल्या धुळे शहरातील लहान पुलाची पाहणी करून परीक्षण करण्यात आले आहे. त्यात त्यांनी ब्रिटिशकालीन उत्कृष्ट नमुने रिट्रोफिटिंग करून जतन केले पाहिजेत, असे निरीक्षण मांडले आहे. त्यानुसार पुलाचे सविस्तर संरचनात्मक परीक्षणही करण्यात आले. त्याबाबतच्या अहवालात हा पूल हलक्या वाहतुकीसाठी सुरक्षित असून, तो पाडू नये. वेळोवेळी देखभाल व देखरेख केल्यास हा पूल अधिक काळासाठी सुरक्षित व वापरण्यायोग्य राहील आणि तोडून नवीन बांधकाम करण्याची सध्या आवश्यकता नाही, असे निष्कर्ष मांडले आहेत. तसेच सध्या अस्तित्वातील लहान पुलाचा वापर कायम ठेवण्यासाठी काही सूचनाही केल्या आहेत. याबाबत २८ डिसेंबर २०२४ ला महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मी स्वतः केलेल्या पाहणीवेळी काही सूचनाही केल्या असल्याचे आमदार अग्रवाल यांनी नमूद केले.

या अहवालानंतर मी मंजूर ९ कोटींच्या निधीतून पांझरा नदीवर सावरकर पुतळ्याला लागूनच दुसऱ्या ठिकाणी पूल बांधण्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गेल्या २२ जुलै २०२५ ला, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना १७ फेब्रुवारी २०२५ व २२ जुलै २०२५ ला, केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना १७ एप्रिल २०२५ ला पत्रासह निवेदन देऊन नवीन पूल कम बंधारा बांधण्यास मंजुरी देण्याची मागणी केली आहे. यासाठी अंडाकृती बगीचा-सावरकर पुतळा-लहान पूल- श्री स्वामी समर्थ केंद्र ते गांधी पुतळ्यापर्यंतचा महापालिकेच्या अखत्यारित असलेला रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा ठरावही मंजूर आहे. त्यानुसार सावरकर पुतळ्यालगत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा पूल बांधण्यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरूही आहे.

पांझरा रिव्हर फ्रंट प्रकल्पांतर्गत पांझरा नदी सुधारणा कार्यक्रमात पूल कम बंधारा असे या कामाचे नियोजन आहे. त्यासाठी मी सर्वेक्षण प्रस्तावही तयार केला असून मंजुरीसाठी शासनाकडे दिला आहे. लवकरच प्रस्तावाला मंजुरी मिळून सध्या अस्तित्वात असलेला लहान पूल कायम ठेवून सावरकर पुतळ्यालगतच मंजूर ९ कोटींच्या निधीतून नव्याने पूल कम बंधारा बांधण्यात येणार असल्याचेही आमदार अग्रवाल यांनी स्पष्ट केले. यामुळे खासदार डॉ. बच्छाव यांनी कुठल्याही कामाचे श्रेय घेताना किमान चार वेळा विचार करावा. त्यांनी स्वतः केंद्रासह राज्य शासनाकडून धुळे शहरातील विकासकामांसाठी निधी मंजूर करून आणावा आणि मग श्रेयाची शेखी मिरवावी, आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे प्रकार थांबवावेत, असा टोलाही आमदार अग्रवाल यांनी यावेळी लगावला. कारण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २८ जुलै २०२५ ला नवीन पुलाच्या बांधकामाबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत मला पत्र दिले असून त्यात लहान पुलाचे झालेले परीक्षण, सर्वेक्षण संदर्भासह सर्व अहवालही सोबत जोडले असल्याचे आमदार अग्रवाल यांनी सांगितले.

Dhule Politics
Solapur News | अक्कलकोट तालुक्यात दबावाचे राजकारण : खा. प्रणिती शिंदे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news