

Praniti Shinde statement
सोलापूर : पुढील काळात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडवून काँग्रेस पक्ष वाढीसाठी सर्वांनी मिळून काम करू. अक्कलकोट तालुक्यातील सध्या दबावाचे राजकारण सुरू आहे. मात्र सर्वसामान्य कार्यकर्ता, पदाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे प्रतिपादन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.
माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्याआधीच प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची काँग्रेस भवन येथे बैठक घेऊन बळ देण्याचे आश्वासन दिले आहे. बैठकीचे प्रास्ताविक सातलिंग शटगार यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगराध्यक्ष डॉ. सुवर्णा मलगोंडा, भीमाशंकर जमादार , अशोकराव देवकते, संजय गायकवाड, राजेंद्र गायकवाड, विजय राठोड, सिद्धाराम चाकोते, सुदर्शन अवताडे, मनोज यलगुलवार, संदीप पाटील, जहांगीर शेख उपस्थित होते.
प्रारंभी अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकून घेतले. यामध्ये माजी सभापती भीमाशंकर जमादार, माजी नगराध्यक्ष सुवर्ण मलगोंडा, संजय गायकवाड, सिद्धाराम चाकोते यांनी आम्ही काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. पुन्हा पक्ष बांधण्यासाठी काम करू असे ठामपणे सांगितले.
खा.शिंदे पुढे म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीत खेड्यापाड्यात फिरत होते .मला लोक भेटत होते, लोक कामे सांगत होते. मी त्यांची कामे करणार आहे. अक्कलकोट तालुक्यात दबावाचे राजकारण आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत एक लाख लोकांनी काँग्रेस पक्षाला मतदान केले आहे. तालुका हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सन्मान देणार असुन कार्यकर्ता व शेतकरी, सर्वसामान्य जनता हे माझ्यासाठी समान आहेत. त्यांच्यासाठी काम करत राहणार आहे. पक्षाची पोकळी भरून काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढे येऊन जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पांडुरंग राठोड, सुनील खवळे ,दिनेश शिंदे, उमाकांत येरवडे,रोहिणी गायकवाड, राजीव गायकवाड, सलाम शेख, कल्याणी कवालगी, सुधाकर पाटील, हनुमंत पाटील, राजशेखर शटगार, बसवराज शटगार, चंद्रशेखर पाटील, अनिल खिनगी, बसण्णा लोहार, उत्तमकुमार वाघमारे पदाधिकारी उपस्थित होते.