

पिंपळनेर,जि.धुळे : साक्री तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यात गेल्या मे महिन्यापासून सुरू झालेला अवकाळी पाऊस तसेच सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पांझरेतील पाणी वाढले आहे.
कॅचमेंट एरियात झालेल्या दमदार पावसामुळे यंदा प्रथमच पांझरा मध्यम प्रकल्प जुलै महिन्यात ओव्हरफ्लो झाला आहे.एरवी ऑगस्ट,सप्टेंबर पर्यंत धरण भरण्याची प्रतीक्षा करावी लागायची.यंदा मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात 1257 दशलक्ष घनफूट पाणी क्षमता असलेले घरण पूर्ण क्षमतेने भरले.त्यानंतर सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला.पांझरा,जामखेली आणि कान या तिन्ही नद्यांमध्ये पाण्याचा जोरदार विसर्ग सुरू आहे.
पांझरा लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पिंपळनेर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आज सामूहिक जल पूजन केले. यावेळी माजी सरपंच योगेश नेरकर यांच्या हस्ते पांझरा नदीला साडी चोळीचा आहेर देऊन जलपूजन करण्यात आले यावेळी माजी सभापती संजय ठाकरे,मा.उपसरपंच प्रताप पाटील,सौ.सुवर्णा आजगे,सतीश पाटील,जे टी नगरकर,डॉ.राजेंद्र पगारे,देवेंद्र कोठावदे,मा.प.स.सदस्य देवेंद्र पाटील,सुभाष नेरकर,निलेश कोठावदे, नितीन कोतकर,प्रतिक कोतकर,प्रमोद गांगुर्डे,सुभाष जगताप,शाम दुसाने, डॉ.प्रशांत बागुल गजेंद्र कोतकर,किशोर चौधरी, रामकृष्ण सोनवणे,प्रकाश आहीरराव,अमोल पाटील, प्रशांत जगताप यांच्यासह गावातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील पांझरा मध्यम प्रकल्प क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे लाटीपाडा धरण क्षेत्रामध्ये पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात आहे.पांझरा नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळवण्यात येते की पांझरा मध्यम प्रकल्प 97.67% भरला असून पुढील काही तासांत विसर्ग जाण्याची शक्यता आहे.तरी नदी काठावरील जे निवासी अथवा जनावरांचा गायगोठा असेल तर नागरिकांनी त्वरित सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे व आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन अपर तहसीलदार दत्तात्रय शेजुळ यांनी केले आहे.