पिंपळनेरला दुचाकी चोरांचे टोळके जेरबंद, सहा दुचाकी हस्तगत

पिंपळनेरला दुचाकी चोरांचे टोळके जेरबंद, सहा दुचाकी हस्तगत

 पिंपळनेर, जि.धुळे पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहर परिसरात घरासमोर लावलेल्या दुचाकी लंपास करणारे टोळके पिंपळनेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत तिघा चोरट्यांकडून सहा दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अधिक वृत्त असे की, दि.30 मे ते 31 मे दरम्यान सतिष लक्ष्मण गांगुर्डे रा.पिंपळनेर यांचे घरासमोरून त्यांच्या मालकीची एम.एच.18/बी.क्यु.2655 क्रमांकाची दुचाकी चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी दि.1 जून रोजी सतिष गांगुर्डे यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली तसेच सदर गुन्ह्याचा तपास असई अशोक पवार यांना सोपविण्यात आला होता. दरम्यान,असई अशोक पवार यांना मध्य प्रदेशातील खेतीया येथे रहाणारा अल्केश अशोक जाधव याने दुचाकी चोरी केल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर सपोनि सचिन कापडणीस यांनी सदर बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणुन देत पथकास कारवाईच्या सुचना केल्या. पथकाने अल्केश जाधव यास मध्य प्रदेशातील खेतीया वैताकवाडी येथुन वरील क्रमांकाच्या दुचाकीसह मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मोहित चंद्रकांत पाटील रा.गांधीचौक पिंपळनेर, कल्पेश दीपक चौधरी, रा.हरीओम नगर, पिंपळनेर यांचेसह चोरी केल्याची कबुली दिली. अधिक चौकशीत तिघा संशयितांनी पिंपळनेर शहरातुन व इतर ठिकाणांवरून घरासमोर लावलेल्या दुचाकी चोरल्याची कबुली देत सहा मोटारसायकली काढुन दिल्या.

यांनी केली कामगिरी

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन कापडणीस,पोसई विजय चौरे,असई ईश्वर शिरसाठ,असई अशोक पवार,पोहेकों प्रकाश मालचे,पोकों प्रविण धनगर, हेमंत पाटोळे,रविंद्र सुर्यवंशी, दिनेश माळी,धिरज गवते, योगेश महाले यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

दुचाकींची ओळख पटविण्याचे आवाहन

दरम्यान,सतिष गांगुर्डे यांना त्यांची दुचाकी मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त करून पोलिसांचे कौतूक केले आहे. यासह ज्यांच्या दुचाकी चोरीस गेल्या असतील त्यांनी दुचाकींची ओळख पटविण्याचे आवाहन पिंपळनेर पोलिसांनी केले आहे. तसेच कागदपत्रांची खात्री केल्याशिवाय कमी किंमतीत दुचाकी विकत न घेण्याचे आवाहन जनतेला या निमित्त केले आहे.

हेही वाचा-

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news