Sakri Leopard Sighting | साक्री तालुक्यातील ४ बिबट्यांचे दर्शन; जीव वाचविण्यासाठी मजुरांची धावाधाव, पिंजरा लावण्याची मागणी

वागदर शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
Leopard
Leopard Pudhari
Published on
Updated on

Dhule Sakri Leopard Sighting

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील वागदर शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी एकाच वेळी चार बिबट्यांचे दर्शन झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. शेतात मका कापणी करत असलेल्या मजुरांच्या दिशेने हे बिबटे धावत आल्याने मजुरांनी जीव वाचवण्यासाठी शेताबाहेर धाव घेतली.

शेतकरी दिपेश गांगुर्डे यांच्या शेतात मका कापणीचे काम सुरू असताना दुपारच्या सुमारास अचानक डोंगराकडून दोन मोठे व दोन लहान असे चार बिबटे खाली येताना दिसले. हा प्रकार पाहताच मजुरांनी काम अर्धवट सोडून घाबरून पळ काढला. गोंधळ आणि आरडाओरड झाल्याने बिबटेही दुसऱ्या दिशेने निघून गेले. मात्र या घटनेमुळे मजुरांमध्ये तीव्र भीती पसरली असून अनेक मजूर आता त्या भागात काम करण्यास तयार नाहीत. परिणामी, शेतकऱ्यांनी तातडीने वनविभागाकडे धाव घेतली.

Leopard
Dhule news | धुळे जिल्ह्यात ऑपरेशन शोध अंतर्गत हरवलेल्या 190 महिला अन् मुला-मुलींना शोधण्यात यश

दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधींनीही वनविभागाच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त केली. नगरसेवक गणेश खैरणार यांनी शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुळशीराम गावित यांना घटनास्थळी बोलावले. डॉ. गावित यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय ढोले यांची भेट घेऊन प्रशासनाच्या संथ कामकाजावर तीव्र टीका केली.

गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी भीतीच्या छायेत जगत असून वनविभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात त्यांनी डीएफओ नायकवाडी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून वागदर शिवारात तातडीने पिंजरा लावण्याचे आदेश देण्याची मागणी केली. कोणतीही अप्रिय घटना घडल्यास त्यास वनविभाग जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news