Dhule news | धुळे जिल्ह्यात ऑपरेशन शोध अंतर्गत हरवलेल्या 190 महिला अन् मुला-मुलींना शोधण्यात यश

धुळे जिल्हयात मिसिंग १६५ महीला व १८ वर्षाखालील २२ मुली व ३ मुलांचा शोध घेण्यात आला Dhule News, Operation Shodh, Dhule Police success, Missing women traced
missing cases
missing casesPudhari
Published on
Updated on

धुळे : जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये दाखल हरवलेल्या महीला व १८ वर्षा खालील मुले व मुली यांच्या अपहरणा बाबत दाखल गुन्हयातील पिडीता यांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन शोध-३ ही विशेष शोध मोहीम राबविण्यात आली. यात १६५ महीला व १८ वर्षा खालील २२ मुली व ३ मुले यांना शोधण्यात यश आले असून या सर्वांना त्यांच्या परिवाराच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.

धुळे जिल्हा घटकातील सर्व पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा तसेच अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष यांच्या मार्फतीने दि.६ मार्च ते दि.२१ मार्च २०२६ या दरम्यान ऑपरेशन शोध-३ ही विशेष शोध मोहीम राबविण्यात आली. सदर मोहीमेकरीता पोलीस उपअधीक्षक, (गृह) पोलीस अधीक्षक कार्यालय यांची नोडल अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली असुन उपविभागीय पोलीस अधिकारी, धुळे, शिरपुर व साक्री यांच्या आधिपत्याखाली तिन्ही उपविभागात प्रत्येकी ३ मिसिंग सेलची स्थापना करण्यात आली होती. त्यात ९ शोध पथकांमध्ये महीला पोलीस अधिकारी,महीला पोलीस अंमलदार यांचा समावेश करण्यात आला होता. जिल्हयातील मिसिंग महीला व अपहृत बालकांचा शोध घेण्यासाठी जिल्हयातील मिसिंग सेल, स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष यांनी संयुक्तपणे ऑपरेशन शोध-३ ही विशेष शोध मोहीम राबविली.

या मोहीमेदरम्यात धुळे जिल्हयात मिसिंग १६५ महीला व १८ वर्षा खालील २२ मुली व ३ मुले असे मिळुन आले आहेत. मिसिंग महीला व अपहृत बालकांचा शोध घेतांना धुळे जिल्हा बाहेरील अनेक जिल्हयात तसेच महाराष्ट्र राज्याचे सिमा लगतचे मध्य प्रदेश व गुजरात राज्यात शोधपथकांनी जावुन पिडीतांचा शोध घेवुन त्यांना सुखरुप त्यांचे कुटूंबियांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सद्या चालू असलेल्या सर्व बंदोबस्त अत्यंत चोखपणे सांभाळुन आपले सामाजिक दायित्व व कर्तव्य समजुन धुळे पोलीस दलाने अत्यंत कष्ट घेवुन ऑपरेशन शोध मोहीमेत यश प्राप्त केले आहे. ऑपरेशन शोध-३ ही विशेष शोध मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे , पोलीस उपअधीक्षक, (गृह) जाधव , तसेच स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news