माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यावर धुळे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Rohidas Patil Cremated | प्रशासनाच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करून वाहिली श्रद्धांजली
Rohidas Patil Cremated
माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यावर धुळे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कारPudhari Photo
Published on
Updated on

धुळे | माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यावर आज धुळे येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गांवडे यांनी प्रशासनाच्यावतीने त्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यावर धुळे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यावर धुळे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सकाळपासूनच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. यानंतर त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. सजवलेल्या वाहनामध्ये त्यांचं पार्थिव ठेवण्यात आले होते. या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते. ही अंत्ययात्रा एस एस व्ही पी एस महाविद्यालयाच्या मैदानावर नेण्यात आली. याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले

यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, खासदार डॉ.शोभाताई बच्छाव, खासदार ॲड. गोवाल पाडवी, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात,आ. ॲड. के.सी. पाडवी,आ. जयकुमार रावल, आ.सत्यजित तांबे,आ. हिरामण खोसकर, शिरीष कुमार नाईक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गांवडे, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, अपर तहसिलदार वैशाली हिंगे, तहसीलदार पंकज पवार, अरुण शेवाळे विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यासह आजी माजी मंत्री, लोकप्रतिनिधी, आप्तेष्ट, नागरिक, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rohidas Patil Cremated
काँग्रेसचा लखलखता तारा निखळला! जाणून घ्या रोहिदास पाटील यांचा जीवनप्रवास

यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, आमदार जयकुमार रावल यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रध्दांजलीपर आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. यावेळी पोलीस दलातर्फे त्यांना बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी हवेत झाडून सशस्त्र मानवंदना दिली. राखीव पोलिस उपनिरीक्षक आर.बी. चौधरी, जे.एस.मेहेते यांच्या पथकाने सलामी दिली. मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. पुत्र आमदार कुणाल पाटील यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यांनी घेतले अंत्यदर्शन

प्रारंभी, राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटनमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरी जावून माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या पार्थिवाचे अत्यदर्शन घेवून पुष्पचक्र अर्पण केले.

अंत्ययात्रेत सहभागी मान्यवर

पालकमंत्री नामदार गिरीश महाजन ,मंत्री दादा भुसे, मंत्री अनिल भाईदास, माजी मंत्री बाळासाहेब थोरात ,खासदार शोभाताई बच्छाव, माजी खासदार सुभाष भामरे, आ.अमरीशभाई पटेल, आ.जयकुमार रावल, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी,माजी मंत्री अरूण गुजराथी , बुलढाणा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ,आ.सत्यजित तांबे,माजी मंत्री गुलाबराव देवकर,आ.हिरामण खोसकर, खा.गोवाल पाडवी, माजी मंत्री के. सी. पाडवी,माजी आ.अनिल गोटे, माजी जि प अध्यक्ष शिवाजीराव दहिते,ॲड. ललिता पाटील, आ.मंजुळाताई गावीत, माजी आ.राजवर्धन कदमबांडे, आ.शिरीष नाईक, प्रतिभाताई शिंदे, माजी खा.बापू चौरे , मनपा आयुक्त अमिता दगडे, माजी महापौर भगवान करनकाळ, रणजित भोसले आदी उपस्थित होते

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news