Kunal Patil | धुळे तालुक्याचा आकांक्षित तालुका म्हणून समावेश: माजी आ.कुणाल पाटील

विशेष निधीच्या माध्यमातून धुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळणार
MLA Kunal Patil
कुणाल पाटील file photo
Published on
Updated on

Dhule Taluka Development

धुळे: सर्वांगिण व गतिमान विकासासाठी धुळे तालुक्याचा आकांक्षित तालुका म्हणून समावेश करण्यात आला आहे. विशेष निधीच्या माध्यमातून धुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळणार आहे, अशी माहिती माजी आमदार कुणाल पाटील यांनी दिली आहे. दरम्यान त्यातून स्थानिक व ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान सुधारण्यात मदत होणार आहे.

धुळे तालुक्याचा सर्वच क्षेत्रातील सर्वांगिण व संतुलित विकासासाठी विविध विभागातून निधी मिळवित माजी आ. कुणाल पाटील हे नेहमीच विकासाकरीता प्रयत्न करीत असतात. दरम्यान धुळे तालुक्याच्या विकास कामांना निधी मिळावा, म्हणून सरकारकडे पाठपुरावा करीत असतात. शासनाच्या विविध योजनेत तसेच विकास कार्यक्रमात धुळे तालुक्याचा समावेश करावा, अशी वारंवार मागणी मुख्यमंत्री तसेच संबधित खात्याच्या मंत्र्यांकडेही केली होती.

MLA Kunal Patil
Dhule News: धुळे महानगरपालिकेचे १६ अधिकारी आणि कर्मचारी निलंबित, कामात कुचराई केल्याचा ठपका

यासंदर्भात कुणाल पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा सन 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करताना राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्याकरीता, समाजाच्या प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी आकांक्षित जिल्हा व तालुका कार्यक्रमाचा राज्य योजनेंतर्गत विस्तार करण्यात येईल, अशी घोषणा केली होती.

कामगिरीच्या आधारावर निती आयोगाकडून संबधित तालुक्यांना विशेष निधी दिला जातो. नुकतीच आकांक्षित तालुक्यांची घोषणा करण्यात आली असून त्यात धुळे तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या विविध योजना, केंद्र पुरस्कृत योजना, जिल्हा वार्षिक योजना राबविण्यासाठी विशेष निधी प्राधान्याने मिळणार आहे.

MLA Kunal Patil
Dhule News | धुळे मनपा स्थायी समिती सभापती पदासाठी लताबाई सोनार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

रस्ते, वीज, पाणी पुरवठा, शाळा, आरोग्य केंद्र या पायाभूत सुविधांचा वेगवान विकास करता येणार आहे. शेतकर्‍यांसाठी शेती प्रकल्प, पाणी अडवा योजना, शेततळे यासह शेती व सिंचन सुविधांमध्ये सुधारणा करण्यास मदत होणार आहे.

रोजगार निर्मिती, आरोग्य व शिक्षण सुविधा, ग्रामीण भागाचा विकास करणे अशा विविध योजना राबविण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. यामुळे धुळे तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news