Workers Protest Dhule | शिरपूर टोलनाक्यावर कामगारांचे आंदोलन; रेसी प्रोजेक्ट कंपनीवर गंभीर आरोप

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या कामगारांनी रेसी प्रोजेक्ट कंपनीवर तक्रारी करत जोडे मारो निषेध आंदोलन
Shirpur Toll Naka Workers Protest
Shirpur Toll Naka Workers ProtestPudhari
Published on
Updated on

Shirpur Toll Naka Workers Protest

सोनगीर : धुळे जिल्ह्यातील शिरपुर तालुक्यातील टोलनाक्यावर कार्यरत असलेल्या टोलनाका कामगारांनी रेसी प्रोजेक्ट कंपनीवर गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला. पगार विलंब, बोनस थकबाकी, सुट्ट्यांचा अभाव तसेच महाराष्ट्रातील राष्ट्रपुरुषांच्या जयंतीला सुट्ट्या नाकारणाऱ्या कंपनीला बदलण्याची मागणी कामगारांनी केली.

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या कामगारांनी रेसी प्रोजेक्ट कंपनीवर तक्रारी करत जोडे मारो निषेध आंदोलन केले. २०१२ ते २०२६ पर्यंत सातत्याने सेवा देणाऱ्या कामगारांनी धुळे पळासनेर टोल व्यवस्थापनाकडे निवेदन सादर करत २०२६-२७ या वर्षासाठी करार न करण्याची मागणी केली.

Shirpur Toll Naka Workers Protest
Dhule News | सिंदखेडा तालुक्यात प्रलंबित फेरफार प्रकरणांपैकी २८ अर्ज निकाली: सातबारा उताऱ्यातील त्रुटी दुरुस्तीच्या २३ अर्जांवर कार्यवाही

कामगारांनी आपल्या निवेदनात कंपनीकडून कामगारांच्या अनेक मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे तसेच पगार वेळेवर न मिळणे, महागाई भत्ता न देणे, दिवाळी बोनस उशिरा देणे, सुट्ट्यांचे पैसे न मिळणे तसेच वार्षिक रजेचे पैसे वेळेत न मिळणे यासारख्या गंभीर समस्या नमूद केल्या आहेत.

याशिवाय पूर्वी कार्यरत असलेल्या कंपन्यांकडून दिला जाणारा प्रोत्साहनपर भत्ता सुद्धा मिळत नसल्याची तक्रार कामगारांनी केली आहे.

रेसी प्रोजेक्ट कंपनी नोंदणीकृत नसल्याचा आरोपही कामगारांनी केला आहे. त्यामुळे कामगारांना बँककर्ज मिळण्यात अडचणी येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच कर्मचारी मेडिक्लेमची पूर्ण मिळत नसल्याने आरोग्य सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कंपनीकडून कोणतेही अधिकृत कागदोपत्री व्यवहार पारदर्शकपणे पार पडत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Shirpur Toll Naka Workers Protest
Dhule News | धुळ्यातील क्षयरोग रुग्ण कक्षातील स्वच्छतेसह अनुपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देश

सदरची कंपनी बाहेरच्या राज्यात असल्याने महाराष्ट्रात व्यवसाय करत असल्याने देखील राज्यातील राष्ट्रपुरुषांचा अवमान करून त्यांच्या जयंतीला सुट्टी नाकारण्यात येत आहे, याचा जाहीर निषेध त्यांनी व्यक्त केला. कामगारांच्या या आक्रमक भूमिकेमुळे टोल व्यवस्थापनावर दबाव वाढला असून या प्रकरणावर काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news