Dhule News | धुळ्यातील क्षयरोग रुग्ण कक्षातील स्वच्छतेसह अनुपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देश

क्षयरोग निर्मूलनासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना सुरू आहेत
Dhule News | धुळ्यातील क्षयरोग रुग्ण कक्षातील स्वच्छतेसह अनुपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देश
Published on
Updated on

धुळे : जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील क्षय रोग रुग्ण कक्षास जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी आज अचानक भेट देत पाहणी केली. यावेळी या कक्षात स्वच्छता नियमित ठेवावी. रुग्णांवर वेळेत उपचार होतील, अशी दक्षता घ्यावी अशा सूचना करीत अनुपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याकडे क्षय रोग निवारण कक्षाबाबत तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत त्यांनी या कक्षास अचानक भेट देत पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, उपजिल्हाधिकारी महादेव खेडकर, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, जिल्हा क्षय रोग निर्मूलन अधिकारी डॉ. सोनिया बागडे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी सांगितले की, क्षयरोग निर्मूलनासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना सुरू आहेत. त्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा क्षय रोग निर्मूलन अधिकारी नियुक्त केले आहेत. या पार्श्वभूमीवर क्षय रुग्णांना वेळेत दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी या कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदैव तत्पर राहिले पाहिजे. या रुग्णांवर वेळेत औषधोपचार केले पाहिजेत. तसेच रुग्ण नियमितपणे औषधे, गोळ्या घेतात किंवा नाही याचीही वेळोवेळी पाहणी करणे आवश्यक आहे. क्षय रोग कक्ष नियमितपणे स्वच्छ आणि निर्जंतुक राहील याचीही दक्षता घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केलेल्या पाहणीत काही अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांनी पाठवावा, असेही निर्देश त्यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news